अरं कुठाय दादा ! देवेंद्र दादांना शुभेच्छा देण्यासाठी जयाभाऊंची घरी सरप्राइज भेट…….
पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे व आमदार देवेंद्र दादा कोठे या दोन युवा नेत्यांची जोडी सध्या जिल्ह्यात चर्चेत आहे. आमदार देवेंद्र कोठे, जयकुमार गोरे यांना मोठे भाऊ मानतात, व शहरात पालकमंत्र्यांचा दौरा असला की,देवेंद्र हे सावलीप्रमाणे सोबत असतात व अल्पावधीत त्यांनी पालकमंत्र्यांचा विश्वास देखील संपादन केला. याला कारण म्हणजे,पालकमंत्र्यांनी वेळोवेळी त्यांच्यावर दिलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली.
काल हुतात्मा स्मृती मंदिरात पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे शिक्षक मेळाव्यासाठी आले असता, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, शहर मध्य मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांच्यासमवेत होते. प्रत्येक वेळी दौऱ्यात असणारे देवेंद्र दादा यावेळी मात्र नव्हते,कार्यकम संपला व भाऊ निघत असताना अंजिखाने हे भाऊंच्या गाडीजवळ उभे होते,यावेळी भाऊंनी कुठय दादा असे ग्रामीण शैलीत विचारले. त्यावेळी दादांचा उद्या वाढदिवस आहे,ते साजरा करणार नसल्याने बाहेर गावी जाणार होते असे म्हणताच सध्या कुठे आहे दादा? म्हणत घरी दादा आहेत कळताच “शाल, फेटा व बुके घेऊन ये, दादांकडे जायचे म्हणत थेट देवेंद्र कोठे यांच्या राधाश्री निवासस्थानी पोहचले व सरप्राइज भेट देत दादांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला
राज्याचे ग्रामविकास मंत्री असताना देखील,आपल्या सोबतच्या सहकारी आमदारांचे वाढदिवस आहे कळताच शुभेच्छा देण्यासाठी घरी जाणे हे एका मोठ्या नेत्याचे लक्षण असून,देवेंद्र कोठेंबद्दल भाऊंच्या मनात असलेले प्रेम या निमित्ताने दिसून आले