सुशीलकुमारांच्या उपस्थितीत रणधिरे- हत्तुरे युवा पिढीच्या एकीचा नारा ! साहेबांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
सोलापूर : एकेकाळी काँग्रेस पक्षाच्या बांधणीत महत्वाची भूमिका बजावणारे आणि विशेष करून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे एकनिष्ठ मानले जाणारे दिवंगत नेते दलित मित्र नागनाथ रणधीरे तसेच मजरेवाडी भागामध्ये कायम वर्चस्व ठेवणारे हत्तुरे कुटुंबीय यांच्यातील युवा पिढी अनेक वर्षानंतर एकत्र आल्याची पाहायला मिळाली. निमित्त होते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सिंहासन कार्यालयाला भेटीचे.
नुकतच काँग्रेस पक्षाने प्रदेशवर श्रीशैल रणधिरे यांना सरचिटणीस पदावर संधी दिली आहे. त्या प्रित्यर्थ काँग्रेस पक्षाचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी रणदिवे यांचा सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार घडवून आणला.
यावेळी हत्तुरे कुटुंबीय आणि रणधिरे कुटुंबियांबद्दल चर्चा करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सुशीलकुमार शिंदे यांनी नागनाथ रणधिरे यांची आठवण सांगताना ते शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाची प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले, हद्दवाढ भागात विशेष करून मजरेवाडी सारख्या मोठ्या परिसरात रणधिरे आणि हत्तुरे यांनी काँग्रेस पक्ष मजबूत आणि मोठा केल्याची आठवण शिंदे यांनी सांगितली.
मजरेवाडी, विमानतळ या भागात हत्तुरे त्यांची मोठी ताकद आहे तसेच होटगी रोडवरील सहारा नगर, तसेच मुस्लिम बहुल भागात रणधिरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधिरे- हत्तुरे यांची युवा पिढी एकत्र आल्याने याचा निश्चितच काँग्रेस पक्षाला फायदा होईल अशी चर्चा आहे.