
IAS मिलिंद शंभरकर यांची सिंहासन कार्यालयाला भेट ; सोलापूरच्या आठवणींना उजाळा
सोलापूर : मुंबई म्हाडाचे मुख्य अधिकारी तथा सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापुरातील प्रसिद्ध सिंहासन या डिजिटल मीडियाच्या कार्यालयाला आवर्जून सदिच्छा भेट दिली.
वन महोत्सव 2025 अंतर्गत म्हाडाच्या वतीने राज्यामध्ये लाखो वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. त्यानिमित्ताने म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल हे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांच्यासोबतच मुंबई म्हाडाचे सीओ मिलिंद शंभरकर आणि म्हाडाची संपूर्ण टीम सोलापूरला आली होती.
रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान मिलिंद शंभरकर यांनी सिंहासन कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादक प्रशांत कटारे यांनी त्यांचे स्वागत केले.
मिलिंद शंभरकर यांनी तब्बल साडेतीन वर्ष सोलापूर मध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार पाहिला. कोरोना सारख्या भयंकर अशा महामारीच्या दोन्ही लाटेमध्ये शंभरकर हे खंबीर म्हणून उभे राहिले, त्यामुळे सोलापुरात शंभरकर हे नाव कायम सर्वांच्या लक्षात राहणारे आहे.
शंभरकर यांनी सिंहासन कार्यालयाला भेट देऊन आपले ऋणानुबंध जपण्याचे पाहायला मिळाले. सिंहासन कार्यालयाची संपूर्ण पाहणी करत त्यांनी कौतुक केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देताना प्रशासकीय स्तरावर कोणतीही मदत लागली तर निश्चित सांगा असे आश्वासन सुद्धा दिले.
यावेळी निवृत्त क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर विद्यापीठाचे अमोल गायकवाड, शशिकांत कटारे, नगर विकास फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष संतोष सोनवणे, सौ.मनीषा कटारे सौ. अनिता गायकवाड, दिलीप चितारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.