आमदार उत्तमराव जानकर यांची आमदारकी धोक्यात ? उच्च न्यायालयात काय घडले !
माळशिरसचे युवा नेते संकल्प हनुमंतराव डोळस यांनी आमदार उत्तम जानकर यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि ए. एस गडकरी यांच्या खंडपीठाकडून आमदार उत्तम जानकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील सुनावणी देखील 30 जुलै रोजी होणार असल्याने आमदार उत्तम जानकर यांची आमदारकी सध्या तरी धोक्यात आल्याचे चित्र आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस विधानसभा मतदारसंघात उत्तम जानकर हे आमदार झाले आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय कायमच वादग्रस्त ठरला आहे.
संकल्प डोळस यांचे वडील स्वर्गीय आमदार हनुमंत डोळस यांनी 15 वर्षापासून आमदार उत्तम जानकर यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती.
त्यांच्या निधनानंतर संकल्प डोळस यांनी आमदार उत्तम जानकर यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
या पुनर्विचार याचिके अंतर्गत आमदार उत्तम जानकर यांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यवंशी आणि गडकरी यांच्या खंडपीठाकडून आमदार उत्तम जानकर यांना नोटीस बजावण्यात आली नोटीस आहे. आमदार उत्तम जानकर यांना हा मोठा धक्का मानला जातोय. पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे.
माजी आमदार राम सातपुते यांनीही माळशिरस मध्ये आपला तळ ठोकला आहे. उच्च न्यायालयाने जानकर यांना नोटीस बजावल्याने माळशिरस तालुक्यातील आंबेडकरी समाजातून आनंदाचे वातावरण व्यक्त होत आहे.