
एमआयएम नेते फारुख शाब्दी यांची सिंहासन कार्यालयाला भेट ; राजकीय विषयांवर झाली चर्चा
सोलापूर : एम आय एम पक्षाचे मुंबई प्रदेश आणि सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दि यांनी बुधवारी सिंहासन न्यूज चॅनलच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
सिंहासनचे संपादक प्रशांत कटारे यांनी त्यांचे स्वागत केले. सोलापूरसह संपूर्ण राज्यातील घडामोडी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून लाखो जनतेपर्यंत सिंहासन सर्वात जलद पोहोचवते याचे त्यांनी कौतुक केले.
शाब्दी यांची नुकतीच एम आय एम पक्षाच्या मुंबई अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आहे. यावेळी शाब्दी यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर त्यांनी भाष्य करताना एम आय एम पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे सांगितले. कुणी सोबत येऊ अथवा न येऊ आम्ही आपली सगळी ताकद लावणार असे सांगत आमचा पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत असेल असे ही ते म्हणाले.