सोलापुरात जात पडताळणीच्या ठिकाणी सुरू होती विद्यार्थ्यांची लूटमार ; काँग्रेस नेत्याने त्याला पळून लावले !
सोलापूर : सध्या जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. त्यामुळे सोलापूरच्या सामाजिक न्याय भवनात असलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी बराच वेळ लागतो. कागदपत्रांच्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी सुद्धा वेळ जातो त्यामुळे विद्यार्थी असतील किंवा नोकरीसाठी ज्यांनी अर्ज केला आहे. त्यांना लवकर दाखले मिळत नाहीत तसेच सोलापूरच्या कार्यालयात जात पडताळणी उपायुक्त पद बरेच दिवस रिक्त होते. त्या पदावर कोणीही आले नाही शेवटी सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्याकडे हा पदभार दिल्यानंतर कुठेतरी कामाला गती आली आहे.
दरम्यान काँग्रेसचे भटक्या विमुक्त जाती जमातीचे शहर अध्यक्ष युवराज जाधव हे शुक्रवारी एका कामानिमित्त जात पडताळणी कार्यालयाकडे गेले असता त्या ठिकाणी एक विद्यार्थी त्यांना रडताना दिसला. त्या विद्यार्थ्याला त्यांनी विचारले असता जात पडताळणी अर्जासोबत जी कागदपत्रे असतात त्या प्रत्येक कागदावर अटेस्टेड करण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये घेतले जात आहेत एवढे पैसे द्यायचे कुठून? अशी अडचण त्यांनी बोलून दाखवली.
नेमका काय प्रकार आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न एवढा जाधव यांनी केला असता सामाजिक न्याय भवन कार्यालयाच्या बाहेर बाजूला एका ठिकाणी ट्रू कॉपी वर अटेस्टेड करण्यासाठी एका कागदाला एक इसम वीस रुपये घेत होता. जाधव यांनी चौकशी केली असता त्यांना ते दिसून आले.
एकीकडे सरकारने प्रत्येक कागदावर सेल्फ अटेस्टेड मंजूर केले असताना संबंधित सहीसाठी वीस रुपये घेत होता. तो पेशाने वकील आहे. याप्रकरणी जाधव यांनी त्याला जाब विचारले असता माझ्या सही ची किंमत वीस रुपये नाही का? ते मी घेणार असे त्याने उद्धटपणे सांगितले.
तेव्हा युवराज जाधव यांनी तातडीने सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांना फोन लावला. आणि त्यांना माहिती दिली. तेव्हा एका सही साठी वीस रुपये येणारा तो वकील बेकायदेशीरपणे पैसे घेत असल्याचे कळल्यानंतर सोनवणे यांनी त्याची त्या परिसरातून हकालपट्टी केली.
याप्रकरणी युवराज जाधव यांनी आवाहन केले आहे की, जात पडताळणी प्रमाणपत्राच्या अर्जासोबत जे कागदपत्र दिले जातात. त्याला सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःची सही करून ती सादर करता येतात. त्यामुळे अशा लोकांना पैसे देऊ नये.