शिवसेना शहरप्रमुख सचिन चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयाचे बुधवारी उद्घाटन
सोलापूर : सोलापूर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी सात वाजता राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे.
कंबर तलाव ब्रीज जवळील वॉटर फ्रंट याठिकाणी हे कार्यालय होत आहे.
या कार्यक्रमाला सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, महिला संपर्क प्रमुख अनिता माळगे, शहर समन्वयक दिलीप कोल्हे, युवा नेते अमर पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.