ब्रेकिंग : सोलापुरात एका शिकाऊ डॉक्टराची आत्महत्या
सोलापुरातून एक धक्कादायक माहिती समोर आली असून डॉक्टर वैशंपायन शासकीय मेडिकल हॉस्पिटल मधील एका शिकाऊ डॉक्टराने आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार त्या डॉक्टराने आपल्या हॉस्टेलमधील राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केल्याची माहिती आहे. आदित्य नामबियर असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे.
डॉक्टर वळसंगकर आत्महत्या प्रकरण ताजे असताना पुन्हा एका डॉक्टराने आत्महत्या केल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे.
या डॉक्टरांनी आत्महत्या का केली. याचे कारण अद्याप अस्पष्ट असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटल येथे या ठिकाणी नेण्यात आला आहे. आपल्या सोबतच्या डॉक्टराने आत्महत्या केल्याचे समजताच सिव्हील हॉस्पिटल मधील डॉक्टरांची मोठी गर्दी झाली आहे.