ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील पिडीतांनो लक्ष द्या ! तब्बल सव्वा तीन कोटीचा निधी…..
सोलापूर : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015 सुधारित नियम 2016 अन्वये दाखल गुन्ह्यातील पिडीतांना अर्थसहाय्य अदा करणेसाठी शासनाकडून माहे फेब्रुवारी 2025 मध्ये 5 कोटी 73 लाख 75 हजार ऐवढा निधी प्राप्त झाला असून अॅट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यातील अत्याचारग्रस्त पिडीत व्यक्तींना आज रोजीपर्यंत रक्कम रू. 2 कोटी 53 लाख 65 हजार ऐवढे अर्थसहाय्य संबंधीत पिडीतांना त्याचे आधार संलग्न बँक खात्यावर PFMS प्रणालीवदरे वितरीत करण्यात आले आहे.
अॅट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यातील ज्या अत्याचारग्रस्त पिडीत व्यक्तींना अर्थसहाय्य मिळाले नाही त्यांनी संबंधीत पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयास भेट देवून अर्थसहाय्य मंजूरीसाठी आवश्यक असलेली पुढील कागदपत्रे तात्काळ सादर करावी.
१. दाखल गुन्हयाचे प्रथम खबर अहवाल (FIR) चे प्रत
२. दाखल गुन्हयाचे दोषारोप (Charge Sheet) चे प्रत
३. पिडीत व्यक्तीचा जातीचा दाखला प्रत
४. पिडीत/फिर्यादी यांचे FIR मधील नावात व जातीचा दाखल्यांवरील नावामध्ये तफावत असल्यास दोन्ही नावाचे एकच व्यक्ती असल्याबाबतचे स्वंयघोषणापत्र (अॅफीडेव्हीट)
५. पिडीत/फिर्यादी यांचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत
६. पिडीत/फिर्यादी यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत
७. पिडीत/फिर्यादी यांचा वैदयकिय तपासणी केलेला अहवाल प्रत
वरील प्रमाणे कागदपत्रे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सोलापूर येथे सादर करण्यात यावी. जेणेकरून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ व संशोधित अधिनियम २०१५ अंतर्गत देण्यात येणारे अर्थसहाय्य मंजूर करून तात्काळ संबंधीत पिडितास अदा करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. ०२१७-२७३४९५० या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन सुलोचना सोनवणे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर यांनी केले आहे.