सोलापुरात बजरंग दल व विहिंपची निदर्शने ; क्रूरकर्मा औरंगजेबची…..
सोलापूर : भारताच्या छताडावरील अत्याचारी, दुराचारी आणि व्याभिचारी क्रूरकर्मा औरंग्याची कबर उखडून टाका, अन्यथा आम्ही कारसेवा करून उखडून टाकणार, अशी घोषणा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने केली. यासंदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सोलापुरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने निदर्शने केली. तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.
सोलापूर जिल्हा परिषद कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी कूरकर्मा औरंगजेबची कबर हटवण्याचा निर्धार शिवजयंतीच्या शुभदिनी करण्यात येत असल्याचे विहिंपने जाहीर केले.
छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबच्या कबरीला सरकारकडून विशेष पोलिस संरक्षण दिले आहे. राज्य सरकार पुरातत्व खात्याच्या आड या कबरीचे संरक्षण करीत असून शिवाय त्यावर लाखो रुपये खर्ची पडत आहेत. हिंदू बांधवांच्या कररूपी पैशातून हा खर्च कदापि मान्य नाही. सरकारने विनाविलंब औरंग्याची कबर काढून टाकावी, यासाठी आज संपूर्ण राज्यभरात विहिंप बजरंग दलाच्यावतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. तसेच विधानसभेत राज्य सरकारने ठराव करून कायदेशीर मार्गाचा अवलंब करून कबर हटवावी. औरंगजेब क्रूरकर्मा होता. त्याने सत्तेसाठी भाउ, वडील यांचीही हत्या केली. धर्मवीर संभाजी महाराज यांना हालहाल करून मारले. शिवाय हिंदुस्दथानातील अनेक मंदिरांची नासधूस केली. महिलांवर अत्याचार केले. त्याची कबर येथे ठेवणे आणि त्याचे संरक्षण निषेधार्ह आहे. त्यामुळे सरकारने कबर हटवणे हाच एकमात्र उपाय आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती आहे या पार्श्वभूमीवर विहिंप बजरंग दलाने प्रतिज्ञा केली आहे. विहिंप जेे संकल्प करते, तेे पूर्णत्वास नेतो, 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्या बाबरी ढाँचा हे उदाहरण आहे. त्यामुळे सरकारने याबाबत कार्यवाही केली नाही तर तिथे कारसेवा करण्याचा निश्चय आज करत आहोत, असे विहिंपचे विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे यांनी सांगितले. तसेच जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, बजरंग दल सहसंयोजक नागेश बंडी, सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी यांचीही भाषणे झाली. तसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देउन सरकारचे लक्ष वेधले. या आंदोलनात विहिंपचे कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोेेेलनात बहुसंख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनाप्रसंगी जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, बजरंग दल सहसंयोजक नागेश बंडी, सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी, गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, जिल्हा सहमंत्री बाबूजी गिरगल, विष्णू जगताप, पुरुषोत्तम उडता, जयदेव सुरवसे, अंबादास अक्कल, संजीव चिप्पा, बसवराज सोलापुरे, अक्षय कनकुंटला, अमितकुमार गडगी, शिवकुमार पसनूर, गोपाल म्हंता, आकाश सूर्यवंशी, दुर्गा वाहिनी संयोजक नंदीनी अक्कल, आदित्य चिप्पा, प्रज्वल बासुतकर, राजेंद्र सैनी आदी विहिंप व बजरंग दलाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.