जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महिला दिनात ‘सुंदर मी होणार’ यावर डॉ. चाकोते यांच्या ब्यूटीफुल टिप्स
सोलापूर : महिलांना समानता देण्याकरिता गतिमानता या ब्रीद वाक्याखाली यंदाचा जागतिक महिला दिन भारतात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने महिला दिनाच्या दोन दिवस अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.




जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदूने, उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्वचा तज्ञ डॉक्टर स्मिता चाकोते यांचे सुंदर मी होणार या विषयावर व्याख्यान झाले.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या महिलांच्या स्वतःला आश्वासित करते की, मी संतुलित, शारीरिक, आणि मानसिक स्वास्थ्य व निरामय आरोग्य मिळवेन आणि जतन करेन या बॅनरवर सर्व महिला अधिकाऱ्यांनी सह्या केल्या.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे निवडणूक आयोगाच्या ट्रेनिंग साठी दिल्लीला असल्याने त्यांनी तिथून जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवला. त्या संदेशाचे वाचन अमृत नाटेकर यांनी केले.
सुंदर मी होणार या आपल्या व्याख्यानात डॉक्टर स्मिता चाकोते यांनी सुंदर दिसण्याबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे अतिशय गरजेचे आहे असे सांगताना त्यांनी उपस्थित महिला कर्मचारी आणि अधिकारी यांना त्वचेच्या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन करत या टिप्स दिल्या. त्या काय म्हणाल्या पहा…