“एक मैं और एक तू | दोनो मिले इस तरह ”
महिला अधिकाऱ्यांनी गाजवली मैफील
सोलापूर : दुआ तू है, ममता की माँ तू बडी खूबसुरत है मेरी माँ अश्या शब्दांनी आईच्या प्रेमाची आणि सौंदर्याची नजाकत आपल्या शब्दांनी मोनिका सिंग यांनी तर उन्हासोबत तुलना करणाऱ्या सोलापूरच्या उन्हावर आईची उपमा स्पष्ट करणारी कविता मनीषा कुंभार यांनी व्यक्त केली. अन सभागृहात उपस्थित असलेल्या दर्दीनी टाळ्या वाजवून दाद दिली. निमित्त होते मुशायरी काव्य आणि कलाकृतीने भरलेल्या एक तू और एक मै या मैफिलीचे.
शुक्रवारी सायंकाळी ” दखनी अदाब फाउंडेशनच्या” वतीने छत्रपती रंगभवन सभागृहात सादर केलेल्या ” एक मै और एक तू ” या मैफिलीच्या कार्यक्रमात या दोन अधिकाऱ्यांनी सोलापूरकराना दिलखुलास आनंद दिला.
नाते संबंध, आईचे प्रेम, प्रियकर प्रेयसीचे हळुवार गोड भांडण आणि अबोल्यातले नाते पाऊस आणि जगरहाटीवर, ऋतुंवर मनमुराद गप्पा मारत यावेळी या दोन्ही कवियित्रीनी आपल्या अनोख्या शब्दांनी मैफिल सजविली. यावेळी सोलापूरच्या उन्हाचे कौतुक करताना कुंभार यांनी आईचा पदर ही कविता तर गुलाबी इशक या सिंग यांच्या रचनेवर अनेकांनी टाळ्यांची बरसात केली.
सादर केल्या अशा कलाकृती
गुलजारांच्या निवडक गजलांची आठवण, माधव दातार यांच्या बहावा कविता, बे ख्याली ही रचना, उस रोज तू आया नही तुझं तक पहुचने के लिये कृष्ण आणि विठ्ठलावर साकारलेल्या शेवटच्या कलाकृतीनेही रसिकाना घायाळ केले.