शिवरायांच्या या मावळ्याने यंदाची जयंती गाजवली ! अनेक सामाजिक उपक्रम घेऊन वेधले लक्ष
सोलापूर : रयतेचा राजा, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदाची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोष मय वातावरणात साजरी करण्यात आली. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने यंदा अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती उत्सव अध्यक्षपदी काँग्रेस पक्षातील युवा नेते तथा वडार समाजातील सामाजिक कार्यकर्ते सुशील बंदपट्टे यांना संधी देण्यात आली. ही निवड बंदपट्टे यांनी सार्थ ठरवल्याचे पाहायला मिळाले. शिवरायांच्या या मावळ्याने यंदाचा उत्सव चांगलाच चर्चेत ठेवला.
सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या सुशील बंदपट्टे यांनी आपल्या संकल्पनेतून असे काही नवनवीन उपक्रम घेतले की, ते कायमच लक्षात राहणारे आहेत.
शिवजन्मोत्सवानिमित्त होणाऱ्या पाळणा कार्यक्रमाला तब्बल साठ हजार हून अधिक महिला उपस्थित राहिल्या, त्याचे योग्य नियोजन करण्यात आले.

प्रथमच महिलांची शिव शोभायात्रा काढण्यात आली. याचे महिलांमधून महिला भगिनींमधून स्वागत झाले. तो उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
किशोरवयीन मुलींचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले, कुस्ती स्पर्धांचे सुद्धा प्रथमच आयोजन झाल्याचे पाहायला मिळाले.
कुस्ती आणि पाळणा सोहळ्याचे पहिल्यांदाच लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.
किशोरवयीन मुलींसाठी गुड टच, बॅड टच शिबिर झाले, छायाचित्र स्पर्धा राबवण्यात आली, प्रथमच रिल्स स्पर्धा घेण्यात आली. बांधकाम कामगारांसाठी नवीन नोंदणी व नूतनीकरण शिबिर घेण्यात आले. मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव अध्यक्ष बंदपट्टे यांनी यंदाच्या शिवजयंतीचे योग्य प्रकारे नियोजन केले.