सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागात अँटीकरप्शनची रेड ; वरिष्ठ सहाय्यकास उचलले
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात असलेल्या वरिष्ठ सहाय्यकाला वीस हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
घनश्याम अंकुश मस्के असे त्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई झाली.
यातील तक्रारदार शिक्षकाची आपल्या शाळेमार्फत वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी फाईल शिक्षण विभागात आली होती. या फाईलवर शिक्षण अधिकाऱ्यांची सही करून देण्यासाठी 40 हजाराची लाचेची मागणी मस्के यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती.
तडजोडीची बत्तीस हजार देण्याचे ठरले. याच दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यातील पहिला हप्ता 20 हजाराचा घेताना गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या आवारात ही कारवाई झाली.