सोलापूर मंगळवेढा रोडवर भीषण अपघातात एक जण जागीच ठार ; दुचाकी गाडीचा चुराडा
सोलापूर : सोलापूर मंगळवेढा रोडवर तिऱ्हे गावापासून दोन किलोमिटर अंतरावर एका स्विफ्ट डिझायर या चार चाकी वाहनाने पाठीमागून दुचाकी वाहना जोराचे धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागी ठार झाला तर दुसरा गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयाकडे हलवण्यात आले आहे.
अपघातातील मृताची आणि जखमीची ओळख पटली नाही. हा अपघात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास झाला. अपघात इतका भीषण होता की, डेस्टिनी या दुचाकी क्रमांक MH 13 EQ 0566 या गाडीला डिझायर या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात उडून पडली आणि त्या गाडीचा चुराडा झाला होता.
स्विफ्ट डिझायर या गाडीचा वेग इतका होता की तिचा ब्रेक न लागल्याने ती गाडी सुमारे तीनशे मीटर अंतरावर जाऊन थांबली होती. अपघात घडताच या रस्त्यावरून जाणारे भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक
तात्यासाहेब नागटिळक हे थांबले त्यांनी तातडीने पोलिसांना आणि महामार्ग पोलिसांनी ही माहिती दिली. पोलीस दाखल झाले त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेतली व जखमीला सोलापूर शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.