सोलापुरात कलेक्टर दिलीप स्वामींवर शुभेच्छांचा वर्षाव ! सोलापुरातील कर्मचाऱ्यांचे प्रेम व सत्काराने भारावले !
सोलापूर : छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा शनिवारचा सोलापूर दौरा आठवणींचा ठरला. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंतर ते छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी झाले त्यानंतर प्रथमच ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले होते, रिस्पेक्टफुल सीईओ म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा कुलदीप जंगम यांनी मोठ्या आदर भावनेने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे झेडपी मध्ये स्वागत केले. झेडपीत आल्यानंतर जुन्या आठवणींमध्ये ते रमल्याचेही पाहायला मिळाले.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी शनिवारी सकाळी सर्वात प्रथम सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतले, त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेला भेट आणि पुढे जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एक या ठिकाणी भेट दिले तिथे विवेक लिंगराज आणि त्यांच्या संचालक मंडळाने त्यांचे स्वागत केले.
मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी कर्तुत्वान महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात घेण्यात आला. आपले पूर्वीचे सीईओ साहेब आल्याचे समजताच जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचारी अधिकारी शिक्षकांनी आवर्जून उपस्थिती लावली.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी आपल्या भाषणात दिलीप स्वामी यांच्या प्रशासकीय कामाचे कौतुक करताना त्यांना भविष्यात सोलापूरचा जिल्हाधिकारी म्हणून पाहायला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रम संपल्यानंतर दिलीप स्वामी यांच्या सत्काराला अक्षरशः रांग लागल्याचे पाहायला मिळाले. कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, शिक्षकांच्या संघटना, कास्ट्राइब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, निवृत्त कार्यकारी अभियंता पंडित भोसले, महिला व बालकल्याण विभाग, अनेक कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार केला. कर्मचाऱ्यांचे इतके प्रेम आणि सत्काराला जमलेली गर्दी पाहून स्वामी साहेब अक्षरशः भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.