डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्यासाठी देव ! सोलापुरात राष्ट्रवादीने अमित शहा यांच्या चेहऱ्याला…..
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत त्यांच्या चेहऱ्याला एका प्राण्याचे स्वरूप देऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
शहराध्यक्ष सुधीर खरटमल, प्रदेश नेते प्रमोद गायकवाड, यु एन बेरीया, मनोहर सपाटे, भारत जाधव, शंकर पाटील, पूनम बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या पुनम घेत समोर या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी खरटमल म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागावी, आमचा खरा देव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. कारण हा देशच त्यांच्या संविधानावर चालतो हे अमित शहा यांनी लक्षात घ्यावे.
प्रमोद गायकवाड म्हणाले, अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहात, तुमची वागणूक म्हणजे एका डुकरासारखी आहे, म्हणूनच आम्ही तुमच्या चेहऱ्याला त्या प्राण्याचे स्वरूप देऊन तुमचा निषेध नोंदवला आहे.