मुस्लिम समाज ठरवणार ‘शहर मध्य’चा आमदार कोण? शेठ, पैलवान को नजर अंदाज करना गलत
सोलापूर : तब्बल तीन टर्म शहर मध्य या मतदारसंघात प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे खासदार झाल्या. त्यामुळे या मतदारसंघात इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी साधून आली आहे.
या मतदारसंघात सर्वाधिक मतदार हे मुस्लिम समाजाची आहेत. त्यानंतर पद्मशाली समाज, मोची समाज, आंबेडकरी समाज, भटका विमुक्त समाज, लोधी समाज, ब्राह्मण समाज यांचा नंबर लागतो. सध्याचे उमेदवार पाहिले तर काँग्रेसचे चेतन नरोटे, भाजपचे देवेंद्र कोठे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्तर हे सर्व समाजाची मते घेऊ शकतात. परंतु एमआयएमचे फारुक शाब्दी यांना सर्वाधिक मुस्लिम मध्ये मिळण्याची शक्यता आहे. पण त्यांना धोका तौफिक शेख यांचा आहे. किती ही हजिसाब अन् पठाण गेले तरी पैलवान यांना मानणारा मुस्लिम समाज पाहता ते या समाजाचे किती मते घेतात त्यावर फारूक शाब्दी यांचे भवितव्य ठरणार आहे.
चेतन नरोटे हे काँग्रेसचे उमेदवार असल्याने यापूर्वी काँग्रेसला रामवाडी सेटलमेंट मधील भटका विमुक्त समाज, मोची समाज, ख्रिश्चन समाज, बऱ्यापैकी लोधी आणि मुस्लिम समाजाची मते काही प्रमाणात पद्मशाली समाज, आंबेडकरी समाज तसेच ब्राह्मण समाज ही मते मिळायची. यंदा काँग्रेसने याच मतांवर आपला फोकस केला आहे. पण यावेळेस मोची समाजात बंडखोरी झाल्याने तसेच भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त समाजात घुसल्याने यासह काँग्रेस मधील माजी नगरसेवक एमआयएम मध्ये गेल्याने काँग्रेस पुढे अडचण झाल्याचे चित्र आहे.
आडम मास्तर यांनी आपल्या 30000 घरकुलांच्या लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. या ३० हजार पैकी सुमारे 75 टक्के लाभार्थी हे शहर मध्य मधील मतदार आहेत. यामध्ये मुस्लिम समाज, पद्मशाली समाज, मोची समाज, भटका विमुक्त समाज, आंबेडकरी समाज हे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांच्या पती-पत्नीने जरी एकत्रित मतदान केले तरीसुद्धा आडम मास्तर हे निवडून येऊ शकतात. पण मुस्लिम समाज एमआयएम कडे व पद्मशाली समाज भाजपकडे आकर्षित झाल्याने मास्तर यांची अडचण होण्याची शक्यता आहे. खरेच जर हे लाभार्थी मास्तर यांच्या प्रयत्नांना जागले तर निश्चितच या ठिकाणी बदल पाहायला मिळेल.
लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या देवेंद्र कोठे यांना भाजप उमेदवारी दिली आहे. मुळात कोठे हे सर्व समाजामध्ये लोकप्रिय मानले जातात. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या एका वक्तव्याने भाजपला अडचणीत आणले पण या निवडणुकीत देवेंद्र कोठे यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात एक शब्दही काढला नाही. उलट मुस्लिम समाजाची मते आपणाला कशी मिळतील यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. समाज म्हणून पद्मशाली त्यांच्यासोबत दिसतात. लोधी, मोची आणि भटका विमुक्त या समाजाच्या मतांवर भाजपचा विजय अवलंबून आहे.
एमआयएम हा पक्ष या पहिल्याच निवडणुकीत आक्रमक पाहायला मिळाला नाही कोणतेही भडक वक्तव्य एमआयएमच्या नेत्यांकडून समोर आले नाही फारूक शाब्दिक यांनी अतिशय सॉफ्टपणे ही निवडणूक हाताळली आहे. त्यांना मुस्लिम समाजा सोबतच आंबेडकरी, ख्रिश्चन, मोची तसेच इतर काही समाजाची मते आवश्यक आहेत. तौफिक शेख यांच्याकडे दुर्लक्ष करणे शाब्दी यांना परवडणारे नाही हे पण तितकेच खरे आहे.
शहर मध्ये या निवडणुकीत मुस्लिम समाजाचा आमदार ठरवणार असे चित्र निर्माण झाले आहे आडम मास्तर, चेतन नरोटे, तौफिक शेख, फारूक शाब्दी यांच्यात मुस्लिम समाजाचे मत विभागली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु मुस्लिम समाजात सध्या कोणाच्यातरी एकाच्या पाठीशी राहायचे असा सूर ऐकण्यास मिळत आहे. मते विभाजित झाली की दुसराच कोणीतरी निवडून येईल अशी चर्चा असून आता मुस्लिम समाज किती प्रमाणात बाहेर पडून मतदान करतो यावर अनेक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.