दक्षिण सोलापूर साठी काँग्रेस कडून दिलीप माने यांना उमेदवारी
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे शेवटी माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झाले आहे. काँग्रेसच्या चौथ्या यादीमध्ये दिलीप माने यांचे नाव आले. त्यामुळे दिलीप माने यांच्या समर्थकांमधून जल्लोष करण्यात येत आहे.
या निवडणुकीत पुन्हा आमदार सुभाष देशमुख विरुद्ध दिलीप माने हा सामना पाहायला मिळणार आहे.
एकीकडे महाविकास आघाडीतून शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना दक्षिण विधानसभेचे उमेदवारी देण्यात आली होती परंतु त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामध्ये दिलीप माने समर्थकांनी माने यांच्या निवासस्थान समोर या मांडला होता त्याच वेळेस ही जागा काँग्रेसला सुटल्याचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले होते.
आता काँग्रेस कडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सोलापूर मध्ये आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान शनिवारी धर्मराज काडादी यांच्याही समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करत काडादी यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यावेळी काँग्रेसचे दक्षिण मधील सर्वच नेते उपस्थित होते. आता दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काडादी समर्थकांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.