पक्षाचा आदेश शिरसंवाद्य, माझा कुणाच्याही नावाला विरोध नाही ; काँग्रेसच्या रियाज हुंडेकरी यांना नक्की काय सांगायचे
सोलापूर : विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे उमेदवारी याद्या जाहीर झाले आहेत मात्र सोलापूर शहर मध्य या हॉट मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या ठिकाणी काँग्रेस पक्ष तसेच ही जागा नेमकी शिवसेना की भारतीय जनता पार्टीला जाणार याची सुद्धा उत्सुकता आहे. काँग्रेस पक्षाकडून जवळजवळ बाबा मिस्त्री यांच्या नावाची निश्चिती झाली आहे. केवळ घोषणा होणे बाकी आहे.
याच पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील काही कार्यकर्त्यांनी बुधवारी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची भेट घेतली. या भेटीत बाबा मिस्त्री यांच्या ऐवजी शहर मध्य मधील इच्छुक कोणालाही उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्व बातम्या प्रसारित होताच काँग्रेस पक्षाचे माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी यांनी मात्र आपली भूमिका अतिशय प्रामाणिकपणे स्पष्ट केली आहे.
ते म्हणाले काँग्रेस पक्षाने जेव्हा इच्छुकांकडून अर्ज मागवले तेव्हा मी सुद्धा मध्य मधून इच्छुक म्हणून अर्ज दाखल केला होता परंतु त्यानंतर माझ्या वैयक्तिक कारणास्तव मी शहर मध्य मधून माघार घेत असल्याची माहिती ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना दिली.
उलट या मतदारसंघात मुस्लिम समाजाने उमेदवारी मिळण्यासाठी जोर लावला आहे. त्याला आपला पूर्ण पाठिंबा आहे परंतु कोणत्याही उमेदवाराला आपला विरोध नाही बाबा मिस्त्री जरी उमेदवार झाले तरी आपणाला आनंदच आहे, पक्ष जो देईल तो उमेदवार त्याला निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार त्यामुळे पक्षाचा आदेश माझ्यासाठी शिरसंवाद्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.