सोलापूर झेडपीचे डेप्युटी सीईओ इशाधीन शेळकंदे यांची ही बदली
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेचे एक चांगले अधिकारी म्हणून ओळख असलेले ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांचीही अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी बदली झाली आहे.
नुकतीच शेळकांदे यांच्या बदलीची ऑर्डर पडली. 13 ऑगस्ट 2021 रोजी ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले मागील तीन वर्षे एक महिने त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये कामकाज केले एकाच वेळी त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभागाची प्रभारी पदाचे कामकाज पाहिले. यापूर्वी तीन वर्षे त्यांनी पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतून आणखी एक चांगला अधिकारी बदली होऊन जात आहे.