देवदर्शनासाठी गेलेली महिला डॉक्टर बेपत्ता ; नवऱ्याला म्हणाली…..
सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या 35 वर्षाची महिला डॉक्टर बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली आहे.
ही घटना शनिवारी, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सिद्धेश्वर मंदिरात घडलीय. पतीस ‘ …तुम्ही घरी चला’ असे म्हणून गेल्या त्या परत आल्याच नाहीत.
विजापूर रस्त्यावरील द्वारका नगरी परिसरात या डॉक्टर राहतात. शनिवारी ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यांची पती यांच्याशी मंदिर परिसरात भेट झाली. या भेटीत मी देवदर्शन करून घरी येते, तुम्ही घरी चला’ असं सांगून देवदर्शनासाठी मंदिरात गेल्या. मात्र त्या २४ तास उलटले तरी घरी आल्या नाहीत.
त्यांचा घराच्या आजुबाजुलाच्या परिसरात, एस. टी. स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, इतर नातेवाईकांकडे शोध घेतली असता, त्या मिळून आल्या नाहीत.
त्यामुळे पतीने पत्नी बेपत्ता झाल्या असल्याची तक्रार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल केली. याबाबत पोलीस आयुक्तालय माहिती कक्षाने ही माहिती दिली आहे. संबंधित महिला कुठे आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.