नवे सीईओ कुलदीप जंगम घेणार शुक्रवारी पदभार ; पहिले आयपीएस नंतर आयएएस ; कुठे कुठे झाली सेवा
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बुलढाणा जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांची नियुक्ती झाली आहे नवे सीईओ जंगम हे शुक्रवारी पदभार घेणार असल्याचे समजले.
केवळ दोन महिन्यातच बुलढाणा जिल्हा परिषदेतून त्यांची बदली सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी झाली आहे. जंगम हे यापूर्वी आयपीएस म्हणून सिलेक्ट झाले होते त्यानंतर दोनच वर्षात ते आयएएस झाले.
कोण आहेत कुलदीप जंगम?
कुलदीप जंगम हे 2018 चे आयपीएस अधिकारी असून त्यांनी डिसेंबर 2019 ते ऑक्टोबर 2020 या 11 महिन्यामध्ये गुजरात पोलीस खात्यामध्ये अहमदाबाद ग्रामीण सहाय्यक पोलीस अधीक्षक पदी सेवा बजावली. त्यानंतर ते 2020 च्या बॅचचे आयएएस झाले. ऑक्टोबर 2020 ते जुलै 2022 एक वर्ष दहा महिने ते महाराष्ट्रातील वाशिम येथे असिस्टंट कलेक्टर म्हणून काम पाहिले. 2022 ते ऑक्टोबर 2022 चार महिने असिस्टंट सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट या ठिकाणी सेवा बजावली. ऑक्टोबर 2022 ते जून 2024 सहाय्यक जिल्हाधिकारी सिल्लोड, संभाजी नगर या ठिकाणी कार्यरत होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झाली लगेच दोन महिन्यात त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.