सोलापूरच्या गणेशोत्सवात राजकीय मॅसेज, आक्षेपार्ह देखावे नको ! पोलीस प्रशासनाच्या बैठकीत महापालिकेच्या सर्वाधिक तक्रारी
सप्टेंबर मध्ये होणाऱ्या गणेशोत्सव निमित्त पोलीस आयुक्तालयात शांतता समितीची बैठक पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला पोलीस प्रशासनातील अधिकारी, महापालिका अधिकारी, शहरातील सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक उपायुक्त विजय कबाडे यांनी केले.
उत्सव मंडळांना सूचना करताना ते म्हणाले, नवीन गणेशोत्सव मंडळांना मिरवणूक परवानगी नाही, ॲडव्हान्समध्ये कागदपत्र देऊन परवानगी काढून घ्या, सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करा, कंटेनर मिरवणुकीत सहभागी होणार आहेत त्यांमध्ये लहान मुले बसतात त्याकडे लक्ष ठेवण्यासाठी दोन व्यक्ती नेमा, गणेशोत्सवात राजकीय मॅसेज नको, कोणत्या राजकीय पक्ष आणि नेत्यांना प्रेजेंट करू नका, मिरवणुकीचा मार्ग बदलू नका, डिजे डॉल्बी आवाजाची मर्यादा पाळा, सजावट देखावे यात आक्षेपार्ह मॅसेज, देखावे असू नये अशा सूचना केल्या.
कुणी काय केल्या सूचना पहा 👇👇👇
विजय पुकाळे
महापालिका मधील एक ही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नाही त्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
विष्णू घाट स्वच्छ करावा, गणपती घाट स्वच्छ ठेवावा, मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवावेत.
श्रीकांत घाडगे
छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील खड्डे बुजवावे, भैया चौक ते मरीआई चौक दरम्यानचे रेल्वे गेट काढता येईल का? ते पहा
दास शेळके
नवीन मंडळ परवानगी बंद केली ती फक्त सोलापुरात आहे का? फक्त गणेशोत्सव मंडळांना आहे हे स्पष्ट करा, निवडणुका असल्याने पोलिसांनी सतर्क राहावे, मध्यवर्ती मिरवणूक मार्गावर परवानगी असल्याशिवाय डिजिटल परवानगी नको, व्यासपीठ परवानगी शिवाय उभे करू नये.
युवराज पवार
बाळीवेस ते कन्ना चौक दरम्यान धोकादायक इमारत पाडाव्यात, हद्दवाढ भागात विहिरी असून त्या पावसाने भरल्या आहेत तिथे मुले गणेश विसर्जन करतात तिथे महापालिका पोलीस बंदोबस्त ठेवावा, मंडपात पत्त्यांचा जुगार चालू नये.
प्रकाश अवस्थी
नवी पेठला जोडणारा रस्ता आहे आम्रपाली हॉटेल समोर मोठा खड्डा आहे तो कायमचा का बुजवला जात नाही?
मनोज बाबावाले
लष्कर मध्यवर्ती मोठे आहे 300 मंडळे सहभागी होतात पण मिरवणूक मार्ग लहान आहे, अनेकांना सहभागी होता येत नाही त्यावर तोडगा काढावा, या मार्गावर मुस्लिम कुटुंब पाण्याची सोय करतो त्यांचा सत्कार करावा.
हेमा चिंचोळकर
सोलापूर शहरात वन वे कुठेच नाही, बोर्ड बाजूला करून वाहतूक सुरू आहे, त्यामुळे वाहतूक विस्कळित होत आहे.
लता फुटाणे
दत्त चौक ते पंजाब तालीम रस्ता बघ्याची गर्दी असते. तिथे बॅरेगेट्सचे व्यवस्थित नियोजन करावे.
शाम कदम
दर वर्षी प्रश्न मांडतो, त्यावर किती कारवाई होते? मोकाट जनावरांचा प्रश्न मोठा आहे, महापालिकेने स्वतंत्र बैठकीचे आयोजन करावे, तक्रारी येतात, पोलीस प्रशासन कारवाई करण्यात कमी पडते का? आवाजाची मर्यादा ठेवावी, परवाने निःशुल्क करावेत.
प्रांजली मोहिकर
डॉल्बी मुक्त मिरवणूक काढली त्याबद्दल सर्व मंडळांचे अभिनंदन, समीक्षक म्हणून चांगले सहकार्य मिळाले, दहा दिवस चांगले उपक्रम राबविता ते कायम ठेवा.
दिलीप कोल्हे
भैया चौक तिथून पुढे येणाऱ्या मिरवणुका आहेत त्यांना रेल्वेने रस्त्यात टाकलेला लोखंडी पुल आहे तो तात्पुरता काढून घ्यावा त्यासाठी रेल्वे प्रशासनाला पत्र व्यवहार करावा.