शिवसेनेच्या निष्ठावंतांना ‘शहर मध्य’ची उमेदवारी द्या ; मनिष काळजेंचे समर्थक झाले आक्रमक
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे हे पुन्हा शिवसेनेकडून शहर मध्य या मतदारसंघातून उमेदवार म्हणून येण्याची चर्चा सुरू झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांमधून निष्ठावंतांना उमेदवारी देण्याची मागणी होत असून मनिष काळजे यांच्या नावाचा जोर वाढला आहे.
सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख मनीष काळजे, जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्यासह प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या नावाचे चर्चा ऐकण्यास मिळते परंतु मागील अनेक दिवसांपासून या मतदारसंघात मनीष काळजे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत आपली मोर्चे बांधणी सुरू ठेवली आहे.
ज्योती वाघमारे यांच्यावर विधानसभेची इतर जबाबदारी दिल्याने त्या या रेसमध्ये येत नाहीत, प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी यापूर्वी माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणुका लढवल्या आहेत त्यामुळे ते मध्य मध्ये चालतील का नाही अशी चर्चा शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि शिवाजी सावंत यांनी त्यांच्या समर्थकांनी काही दिवसाखालीच माढ्यामध्ये बैठकीमध्ये माढ्यातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केल्यामुळे ते शहर मध्यच्या चर्चेतून स्वतःच बाहेर पडल्याचे बोलले जात आहे.
महेश कोठे यांच्या नावाची पुन्हा मध्ये चर्चा सुरू झाल्याने शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. महेश कोठे यांनी यापूर्वीही पक्षाला सोडून बंडखोरी केली होती. याउलट मनीष काळजे हे शाखाप्रमुख पासून ते जिल्हाप्रमुख पदापर्यंत शिवसेनेची आपल्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी प्रामाणिकपणे काम करत आहेत.
यंदा पक्षाला या मतदारसंघात यावेळी चांगले वातावरण असताना बाहेरचा उमेदवार देण्याची गरज काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सोलापूर शहरातील शहर मध्य या मतदारसंघात कोट्यवधीचा विकास निधी आला आहे. विशेष म्हणजे शहर मध्य मध्ये सर्व समाजाच्या विकासाचा विचार करताना मुस्लिम बहुल भागातही मनीष काळजे यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
शहर मध्य या मतदारसंघात काळजे यांनी केलेली विकास कामे
एमआयडीसी मधील रस्ता ड्रेनेज विविध सुविधा करिता 4 कोटी
68 लिंगांपैकी एका लिंगाचे काँग्रेस भवन शेजारील महालिंगाचे सुशोभीकरण 15 लाख
स्वातंत्र्य सैनिक नगर या सोसायटीमध्ये गार्डन सुशोभीकरण 20 लाख,
कर्णिक नगर येल्लालिंग मठा समोरील अक्कलकोट रोडला जोडणारा रस्ता दुरुस्ती 51 लाख
लोधी समाजाच्या शितलादेवी मंदिर येथे स्वखर्चातून 91 हजार रुपये याचे सीसीटीव्ही बसवले
बापूजी नगर प्रभाग क्रमांक 13 येथे 60 लाख निधीचे विविध रस्ते काम
गांधीनगर येथील दाराशी हॉस्पिटलमध्ये लिफ्ट बसवणे व इतर सुविधा 20 लाख
गुरुनानक चौक ते कुमठा नाका रस्त्यावरील डिव्हायडर व डिव्हायडर लाईट बसवणे 20 लाख
वल्याळ ग्राउंड येथे क्रीडा विभागातून विविध सुविधा सुशोभीकरणाकरिता 51 लाख निधी
अशोक चौक बस डेपो शेजारील हनुमान मंदिर विकसित करणे 15 लाख
बोळकोटे नगर ते सत्यसाई नगर येथील काँक्रिटीकरण करिता ३० लाख
अक्कलकोट रोड येथील कल्पना नगर येथे पाण्याची पाईपलाईन टाकून त्या ठिकाणी रस्ता करण्याकरिता 70 लाख