‘दक्षिण’चे प्रश्न विधान परिषदेत मांडू ; अंबादास दानवे ; अमर पाटील यांनी दिले निवेदन
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा आमदार असल्याने मतदारसंघाचा विकास झाला नाही.आपण येथील महत्त्वाचे प्रश्न आपण विधान परिषदेत मांडून ते सोडविण्याचे प्रयत्न करू अशी ग्वाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
विरोधी पक्षनेते दानवे हे सोलापूर दौऱ्यावर आल्यावर शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न विधान परिषदेत मांडून आवाज उठवावा अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलताना दानवे म्हणाले, भीमा नदीवर वडापूर येथे बॅरेज, जुळे सोलापूर येथे स्वतंत्र महानगरपालिका मंजूर व्हावेत,मंद्रूपला तालुका घोषित करावेत.येथे उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत. मंद्रूप येथे जिल्हा रुग्णालय व्हावेत.मंद्रूपला उपनिबंधक कार्यालय मंजूर करावे. मंद्रूप तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरावेत. मंद्रूप क्रीडा संकुल अपूर्ण अवस्थेत असून येथे विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावीत. मंद्रूप येथे बाजार समिती सूरू करावी.तेरामैल-मंद्रूप-मोहोळ रस्ता चौपदरीकरण करावेत. सोलापूरच्या हद्दवाढ भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात. मतदारसंघात विविध मंदिर व मशींदीना तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा. उजनीचे अतिरिक्त पाणी दक्षिण तालुक्यातील कालवे आणि विविध तलावात पाणी सोडावेत.यासह आदी प्रश्न आपण मांडणार आहोत.असे आश्वासन त्यांनी शेवटी बोलताना दिली.
यावेळी उपनेते शरद कोळी, भीमाशंकर म्हेत्रे, संतोष पाटील, योगीराज पाटील, धर्मराज बगले, रवी कांबळे, शरणराज केंगनाळकर, राजू बिराजदार, बालाजी चौगुले, प्रिया बसवंती, मीनल दास, राहुल गंधुरे, आनंद थोरात, अजित स्वामी, सुरेश शेंडगे, संतोष घोडके आदी उपस्थित होते.