चेतन नरोटे यांच्या उमेदवारी मागणीने मध्य मध्ये रंगत वाढली ; अध्यक्षांचे शक्तीप्रदर्शन
सोलापुरातील काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम समाज आणि मोर्चा समाजाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला दावा सांगितला आहे. आताच आता शहराध्यक्ष चेतन नरोटे हे सुद्धा शहर मध्य मधून इच्छुक म्हणून पुढे आले आहेत. अध्यक्षांनी उमेदवारी अर्ज मागणी केल्याने या मतदारसंघात आता चांगलीच रंगत वाढल्याचे पाहायला मिळते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकित काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्याकडे काँग्रेस भवन येथे सूपूर्त केला.
अध्यक्ष चेतन नरोटे हे मोटरसायकल रॅलीवर काँग्रेस भरण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराध्यक्षांनी भव्य असे शक्ती प्रदर्शन करून काँग्रेसच्या हक्काच्या शहर मध्य या मतदारसंघावर आपला दावा केला आहे.
यावेळी किसन मेकाले, महिला अध्यक्ष प्रमीला तूपलवंडे, उस्मान सय्यद, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अमोल भोसले, भीमाशंकर टेकाळे, देवाभाऊ गायकवाड, NK क्षीरसागर, कोमोरो सय्यद, महादेव येरनाळ, दिंगबर मेटकरी, पांडुरंग पुट्टा, अप्पासाहेब सलगर, बसवराज म्हेत्रे, दशरथ सलगर, रुपेश गायकवाड, तिरुपती परकीपंडला, गणपत गवळी, पृथ्वीराज नरोटे, तुकाराम महाराज देवकते, हमीद शेख, अप्पा हडचद, भारत शिंदे, विजू पिसे, लक्ष्मण जगताप, दिनेश पिसे, विजय थोरात, राजू पुठ्ठा, गोपी चीलवेरी, प्रभाकर जकका, समीर सय्यद, संजय गवळी, रामभाऊ जाधव, शाहू सलगर, नूर अहमद नालवर, श्रीकांत दासरी, संजय गायकवाड, धीरज खंदारे, कोंडणताई काकडे, शिवशंकर अंजनाळकर, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, राजेश झंपले, सुभाष वाघमारे, संजय कांबळे, अंबादास कोळी, युवराज जानकर, अन्वर पटेल, मोहसीन फुलारी, सलीम मनूरे , चंद्रकांत मानवी, अंबादास कोळी, चंद्रकांत मानवी, श्रीधर वाघमोडे, रामभाऊ दुधाळ, शंकर नरोटे, मुन्ना कोथींबीरे, मुन्ना तहसीलदार, अविन चवरे, प्रकाश सलगर, गणपत कटरे, कुमार मेडेदार, हर्षल वाघमोडे, विशाल नायकोडी, किरण फंड, यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.