मुंबई : सध्या संपूर्ण भारतात नवरात्र महोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो. नवरात्र उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. संपूर्ण महाराष्ट्राचा प्रशासकीय कारभार चालणाऱ्या मुंबई मंत्रालयात सुद्धा स्त्रीशक्तीचा जागर दिसून आला.
नवरात्र उत्सवातील पाचवा दिवस या दिवशी पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे. पिवळा रंग म्हणजे आरोग्य, ज्ञान, मुलाचे सुख, सौभाग्यावतींना आशाबादी प्रसन्न करणारा पिवळा रंग मानाला जातो.
मुंबईच्या मंत्रालयात प्रशासकीय कारभार पाहणाऱ्या महिला सेक्रेटरीनी एकत्र येत या दिवसाचा आनंद द्विगुणित केला.
मंत्रालयीन महिला सचिवांमध्ये मनिषा म्हैसकर, अश्विनी भिडे, प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह इतर वरिष्ठ महिला अधिकारी उपस्थित होत्या. यावेळी मंत्रालयीन स्वच्छतेचा जागर करण्यात आला.