सोलापूरच्या मराठा धनगर समाजाने का मानले खासदार प्रणिती शिंदेंचे आभार
लोकसभेच्या अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांनी दोन्ही समाजाला दिलेला शब्द खरा करून दाखविला. आपल्या पहिल्याच भाषणात मराठा व धनगर समाजाच्या ज्वलंत अशा आरक्षण प्रश्नावर आवाज संसदेत पोहचवला.
विशेषतः मराठा आरक्षणाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांचा त्यांनी उल्लेख करून त्यांच्या उपोषणाची व लढ्याची दखल सरकारने घ्यावी व आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तोडगा काढावा अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारकडे केली. म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांचे मराठा – धनगर समाजातील सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले.
यावेळी आभार माणण्याकरिता सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, अनिल मस्के, बजरंग जाधव, पंडित बुवा गणेशकर, दीनानाथ शेळके, बापू घुले, मारुती सावंत, शाहू सलगर, शंकर नरोटे, शशिकांत शेळके, सचिन गुंड, शितलकुमार टेकाळे, अजिंक्य पाटील, राजू नाईक सौरभ साळुंखे, गणेश वड्डेपल्ली यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.