सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरातील शोभादेवी नगर येथे राहणारा इरफान युसुफ शेख वय 25 यांने हैद्राबाद येथे जाऊन रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.
इरफान हा शुक्रवार पासून बेपत्ता होता, इरफान युसुफ शेख हा बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आली होती.
काल मंगळवारी संध्याकाळी 6.30 हैद्राबाद येथून पोलिसांचा फोन आला की इरफान युसुफ शेख या नावाच्या मुलाने रेल्वे खाली येऊन आत्महत्या केल्याचे फोन आले.
इरफान युसुफ शेख याची डेथ बॉडी याण्यासाठी हैद्राबाद येथे इरफानचे नातेवाईक गेले आहे. दरम्यान मयत इरफान याने आपल्या खिशामध्ये एका डायरीत स्वतःचं पूर्ण नाव पत्ता लिहून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगत माझी डेड बॉडी माझ्या घरच्यांकडे सुपूर्त करा अशी विनंती त्या डायरीच्या एका पानावर लिहून केली आहे.
सोलापुरातील वाढत्या आत्महत्या बाबत आता पोलीस प्रशासनाने जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.

.jpg)


















