सोलापूर : श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने परमपूज्य नि.श्री.ष.ब्र. वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार दि. ०६ फेब्रुवारी रोजी श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराज्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात व श्री.ष.ब्र. चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी श्री बृहन्मठ होटगी यांच्या नेतृत्वाखाली य अनेक प्रमुख शिवाचार्यांच्या उपस्थितीत श्री वीरतपस्वी आत्मज्योत व रथोत्सव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. ०५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रीक्षेत्र होटगी व उत्तर कसब्यातील होटगी मठात ‘श्री’ स रुद्राभिषेक, सहस बिल्वार्चन व महामंगलारती व सायंकाळी होटगी येथील बृहन्मंठात भक्तगणांच्या वतीने रथोत्सव, अग्रीप्रवेश आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सोमवार दि. ६ फेब्रुवारी रोजी पहाटे २.१० वाजता उत्तर कसब्यातील होटगी मठात व मौजे होटगी, ता.द. सोलापूर येथील मठात श्री वीरतपस्वी आत्मज्योतीचे प्रज्वलन शिवाचार्यांच्या अमृतहस्ते, व असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत श्रद्धांजली समर्पण कार्यक्रम संपन्न होणार आहे. लि.श्री.ष.ब्र. तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजीनी सन १९९६ पासून श्री वीरतपस्वी आत्मज्योत व रथोत्सव यात्रा मिरवणूक प्रारंभ केले. या आत्मज्योत व रथोत्सव मिरवणूकीस पहाटे ५.०० वा. प्रारंभ होणार आहे. श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात व श्री.ष.ब्र. चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी श्री बृहन्मठ होटगी है श्री वीरतपस्वी आत्मज्योत आपल्या शिरावर घेऊन शिवाचार्यांसह भक्तिमय वातावरणात होटगीकडे प्रस्थान करणार आहेत. या पदयात्रेत पंचक्रोशीतील भक्तगण सहभागी होणार आहेत. ही पदयात्रा महिकार्जुन मंदिर, बाळीवेस, चाटीगली मंगळवार पेठ, मधला मारुती, माणिक चौक, बिजापूर वेस, पंचकड़ा, गुरुभेट, सातरस्ता, गांधीनगर, होटगी नाका, आसरा, मजरेवाडी, साखर कारखाना या मार्गाने होटगीकडे प्रस्थान होणार आहे. प्रसाद व्यवस्था – श्री वीरतपस्वी आत्यज्योतीच्या पदयात्रेतील भक्तगणांसाठी प्रसादाची व्यवस्था गुरुभेट सुभाष उमदी, शांतकुमार हिरेमठ, शिवानंद मुनाळे, काडादी नगर अँड. रविंद्र दुलंगे, प्रकाश जम्मा, • फताटे इंडस्ट्रिज रवि फताटे आसरा सोसायटी जयश्री – ज्वेलर्सचे मालक राजकुमार तंबाके, विसावा मा. नगरसेवक आप्पासाहेब हत्तूरे, शिवपुत्र रायण्णा काळगीकर, सोमशेखर आण्णाराव – पाटील, गांगजी मंगल कार्यालय विठ्ठल कुंभार, गौरीशंकर आळंगे, बिजयकुमार हुले, लक्ष्मीकांत त्रिशुले हत्तुरे वस्ती मल्लिकार्जुन नुला, चन्नवीर कोले, दिदुरे मंगल कार्यालय परमेश्वर दिडुरे, शिवशाही समोर राजशेखर रोडगीकर, साखर कारखाना सिद्धेश्वर सह. साखर कारखाना, होटगी तलाव श्री हरिष पाटील, अण्णाप्पा आलुरे, शिवशक्ती फार्मचे मालक चव्हाण, श्रीकांत धनवे वरील सर्व ठिकाणी सद्भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
वीरतपस्वींच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम वीरतपस्वी व्याख्यानमाला लि.श्री.प.ब्र. वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मंदिर परिसरात श्री वीरतपस्वी शिक्षण संकुलाच्या मैदानात गुरुवार दि. ०२ फेब्रुवारी ते शनिवार दि. ०४ फेब्रुवारी पर्यंत सायं. ६.३० वाजता श्री वीरतपस्वी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे.


















