आमदार विजयकुमार देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क : राम सातपुते दोन लाखाने विजयी होणार
सोलापूर : शहर उत्तर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी नूतन मराठी विद्यालय मध्ये साडेनऊच्या सुमारास येऊन मतदान केले.
यावेळी बोलताना विजय देशमुख म्हणाले, ही निवडणूक देश कोणाच्या हातात द्यायचा यासाठी आहे देव, धर्म आणि देशासाठी लोक मतदान करत आहेत त्यामुळे भाजपचे उमेदवार राम सातपुते हे दोन लाखाच्या फरकाने सोलापुरात विजयी होतील असा दावा आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला.