आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या कुटुंबासह येऊन केले मतदान ; म्हणाले तिसऱ्यांदा मोदी सरकारच येणार
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या पत्नी आणि मुलगा मनिष देशमुख यांच्यासोबत येऊन लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल या मतदान केंद्रावर सकाळी साडेसात वाजता मतदानाचा हक्क बजावला. यावेळी या आदर्श मतदान केंद्रावर त्यांनी सेल्फी काढला.
सकाळी सात वाजल्यापासूनच या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सुभाष देशमुख व त्यांचे कुटुंब आणि रांगेत नागरिकांशी गप्पा मारून मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले, मी सकाळी लवकर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. सोलापूरच्या नागरिकांनी आपला हक्क बजावावा असे आवाहन करताना काँग्रेसच्या उमेदवारावर टीका केली. सगळेच उपरे असतात परंतु लोकसभा निवडणुकीत कोणाला काही देणे घेणे नाही, प्रत्येकजण विकासाला बघून मतदान करतात. आम्हाला 2045 चा विकसित भारत निर्माण करायचा आहे त्यामुळे दुसऱ्यांदा देशात मोदी सरकारच येणार असा दावा केला.
या मतदान केंद्रावर सकाळी सात पासून विशेष करून वयोवृद्ध नागरिकांनी सकाळ सकाळीच आपले मतदान उरकून घेतल्याचे दिसून आले. आपल्या कुटुंबीयाच्या साह्याने घेऊन नागरिकांनी मतदान केले.