राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीर ‘विकास ‘ ज्याला लाभला नरेंद्र मोदींचा ही सहवास ; कोण आहे हा विकास?
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार सात मे रोजी मतदान होणार आहे. मागील महिन्याभरात सोलापूरच्या उमेदवारांचा प्रचार चांगलाच गाजला. या प्रचारादरम्यान अनेक अशी व्यक्ती आहेत की ज्यांनी सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं होतं.
भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात विकास हा शब्द फार कमी प्रमाणात ऐकण्यास मिळाला असला तरी विकास नावाचा व्यक्ती याने मात्र या निवडणुकीत आपली एक ओळख निर्माण केली आहे. तो विकास म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सोलापूर जिल्हा सरचिटणीस, मोहोळ तालुक्यातील विकास वाघमारे.
विकास वाघमारे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता, सहकारी. राम सातपुते यांनी जेव्हा 16 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सोबत केवळ उमेदवार सोडून चार जणांना परवानगी होती. त्या चार मध्ये हा विकास वाघमारे होता. यावरून तो रामभाऊंच्या किती जवळ आहे याचा प्रत्यय प्रत्येकांना आला.
या प्रचारादरम्यान विकास वाघमारे यांनी राम सातपुते यांची पाठ सोडली नाही, रोजच्या रोज प्रचारात विकास वाघमारे हा राम सातपुते यांच्यासोबत पाहायला मिळाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात विराट अशी सभा झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची महायुती आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या स्टेजवर या सर्वांना संधी संधी देण्यात आली. त्यामध्ये विकास वाघमारे या सुद्धा युवकाने स्टेजवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर पाठीमागे विकास वाघमारे दिसत होता. यावरून या युवकाचे महत्त्व सोलापूरच्या राजकारणात किती वाढले हे दिसून येते.
कोण आहे विकास वाघमारे?
नाव – विकास विठोबा वाघमारे
पत्ता – वाघोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर. पिन – 413253
मो. नं – 8379977650
जन्म तारीख- 18 जुलै 1996
शिक्षण – बी.ए. (राज्यशास्त्र)
जात – हिंदू चांभार
वडील – विठोबा आप्पाराव वाघमारे – मजुरी
आई – संगीता विठोबा वाघमारे – अंगणवाडी सेविका
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालपणापासून स्वयंसेवक
* अभाविप – 2012 पासून अभाविपमध्ये सक्रिय
सोलापूर शहर शिवाजी भाग सहमंत्री,
शिवाजी भागमंत्री, सोलापूर शहर कार्यालय मंत्री – 2 वर्षे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, कला मंच शहर प्रमुख, प्रतिभा संगम संचलन समिती सलग 4 वर्षे.
* JNU का सच कार्यशाळेसाठी भोपाळ, उत्तर प्रदेश येथे प्रवास.
* विद्यार्थी विस्तारक म्हणून परभणी,ठाणे व सोलापूर शहरात अनेक महिने कार्य.
* अभाविपच्या अनेक आंदोलनात नेतृत्व केले, पठाणकोट हल्ला निषेध, शिक्षणमंत्री पुतळा जाळून आंदोलन, सोलापूर विद्यापीठ सिनेट बैठक उधळणे, शितल साठे शाहिरी जलसा कार्यक्रम उधळणे, रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणात जिल्ह्यात जाहीर सभा, जेएनयू का सच कार्यक्रमात नेतृत्व केले.
* लेखन क्षेत्रात राजकारण, सामाजिक व ग्रामीण स्थितीवर प्रामुख्याने सडेतोड आणि परिणामकारक लेखन.
* शेतकरी प्रश्नावर आवाज उठवल्या- बद्दल भूमीपुत्र पुरस्काराने सन्मानित,
* सोशल मीडियात अभ्यासू,परखड आणि मार्मिक लेखन.
* राजकीय – वयाच्या २४ व्या वर्षी वाघोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील ग्रामपंचायतीचे बिनविरोध युवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो.
* वयाच्या २६ व्या वर्षी २०२१ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीस म्हणून निवड.
* वयाच्या २८ व्या वर्षी २०२४ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या (फादर बॉडी) सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी निवड.
* राजकीय आंदोलने – शेतकरी वीजबिल माफीसाठी आंदोलन, दूध दरवाढीसाठी आंदोलन, उजनी धरणातील सोलापूरच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी महाराष्ट्र दिनी मोठे आंदोलन, महाराष्ट्र बचाव आंदोलनात सक्रिय सहभाग, ओबीसी राजलीय आरक्षण मिळावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळून भव्य आंदोलन, आरोग्य भरती परीक्षेत घोटाळा झाल्याबद्दल तत्काळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या फोटोला जोडे मारुन आंदोलन केले.
भारतीय जनता पार्टीच्या सर्व अभियान आणि कार्यक्रमात सक्रिय सहभाग आणि सामाजिक कार्यक्रमात उपस्थिती.