बाप तो बाप रहेगा…..! बाप तो बाप रहेगा…..!
सोलापूर : 2024 ची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी लक्षात राहणारी असेल. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या ऐवजी त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे या निवडणूक लढवत आहेत. निवडणूक जाहीर होण्याच्या दोन महिने अगोदरपासूनच प्रणिती शिंदे यांनी आपला प्रचार सुरू केला होता. त्यामुळे या मतदारसंघातील सुमारे साडेचारशे गावांमध्ये त्या पोहचू शकल्या आहेत. या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी बाप म्हणून आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीर अशी भूमिका बजावली आहे.
2014 आणि 2019 या लोकसभेच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा झालेला पराभव, त्यांनी तितक्याच ताकतीने पचवला. दहा वर्षानंतर महाराष्ट्रात भाजपा विरोधी एक प्रकारे लाट तयार झाली. आमदार प्रणिती शिंदे यांनी यंदा काहीही करून वडिलांच्या दोन पराभवांचा बदला घ्यायचा हे ध्येय मनात ठेवून निवडणुकीच्या मैदानात त्या उतरल्या आहेत. काँग्रेसला वाटते तितकी ही लोकसभा निवडणूक सोपी नाही हे सुशीलकुमार शिंदे जाणून आहेत. त्यामुळे ते सोलापुरातच तळ ठोकून आहेत. शिंदे यांचा पूर्वीपासूनच सोलापुरातील सर्व समाज, सर्व राजकीय पक्ष यांच्यासोबत असलेले चांगले संबंध यंदा त्यांच्या कामाला येत आहेत.
छोट्याशा ढोर समाजातून आलेले सुशीलकुमार शिंदे सोलापुरात कायमच सर्वधर्मसमभाव जपत आले आहेत. त्यामुळे सोलापुरातील मराठा समाज, ब्राह्मण समाज, पद्मशाली समाज, लिंगायत समाज, धनगर समाज, मोची समाज, आंबेडकरी समाज, ख्रिश्चन समाज, लोधी समाज, भटका विमुक्त समाज, मुस्लिम समाज या सर्वांमध्ये सुशीलकुमार यांची लोकप्रियता आजही टिकून आहे.
या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा असते त्या सोबतच सुशीलकुमार शिंदे यांची सुद्धा स्वतःची प्रचार यंत्रणा त्यांनी तैनात ठेवली आहे, या निवडणुकीत बापलेक दोघे मिळून काँग्रेस पक्षाचा प्रचार करीत आहेत. एकीकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्ह्यात अनेक राजकीय खेळ्या करत आहेत, तोडा, फोडा आणि जोडा असे राजकारण भाजपचे एकंदरीत पाहायला मिळते पण राजकारणातील अनुभवी, राजकीय डावपेच माहीत असणारे, शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा काही कमी नाहीत त्यांनीही भाजपमधील नाराजांना आपल्याकडे आणण्यात यशस्वी भूमिका पार पाडली आहे.
भाजप यावेळी हिंदुत्ववादाचा मुद्दा जाणीवपूर्वक आणि तितक्याच आक्रमकतेने उपस्थित करू लागला आहे, हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद यावरून सुशीलकुमार शिंदे यांना लक्ष्य केले जात आहे. परंतु त्या आरोपांना उत्तर देताना शिंदे आपली मानसिकता ढळू देत नाहीत, सर्वधर्मसमभाव जपण्याचे काम ते कायम करीत आलेले आहेत.
सुशीलकुमार शिंदे यांच्यावर भाजप करीत असलेल्या टीकेबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना विचारल्यावर ते म्हणतात “बाप हा बापच असतो, बापाला कुणी आव्हान द्यायचं नसतं !