बाबा करगुळे माझा लहान बंधू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार ; आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीने वाढदिवसाला रौनक
सोलापूर ; जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ शहर जिल्ह्याचे सरचिटणीस, सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोनापुरे चाळ येथील इद्रप्रस्थ हॉलमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आले.
सत्कारानंतर बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, बाबा करगुळे हा एक लढवय्या कार्यकर्ता असून मला अभिमान आहे की ते आमच्या काँग्रेस पक्षाचा एक घटक आहे. त्यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना अनेक प्रकारचे कार्यक्रम व आंदोलने करून काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले, देशाच्या पंतप्रधानांना आडवणाचा प्रयत्न कोणी केले असेल तर तो बाबा करगुळे यांनी. जेव्हा जेव्हा मला लढायची वेळ आली तेव्हा मला बाबा करगुळेची आठवण येते. बाबा माझा लहान बंधू असून आमच्या घरातील सदस्य आहे. त्याच्या पाठीशी व त्यांचा परिवाराचा पाठीशी मी व आमच्या परिवारातील सर्वजण खंबीरपणे उभा राहणार या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना बाबा करगुळे म्हणाले, मोची समाज हा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि यापुढेही उभा राहील, जोपर्यंत बाबा करगुळे जिवंत आहे तोपर्यंत आम्ही ताई तुमची साथ सोडणार नाही. तुम्ही या निवडणुकीत शंभर टक्के खासदार होणार परंतु शहर मध्य मधून मोची समाजाला आमदार होण्यासाठी संधी द्यावी जरी मध्य मधून उमेदवारी नाही मिळाली तर विधान परिषदेवर मोची समाजाला संधी द्यावी अशी अपेक्षा करगुळे यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, मोची समाज जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे, माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, लक्ष्मीकांत साका, प्रा.नरसिंह आसादे, बसवराज म्हेत्रे, सिद्राम कामाटी, जेम्स जंगम, हणमंतु सायबोळू, आंबादास गुत्तीकोंडा, नागनाथ कासलोलकर, बाबु विटे, रवी असादे, रतिकांत कमलापुरे, शिवराम जगले, तम्मा विटे, अर्जुन साळवे, ईश्वर म्हेत्रे, अशोक सायबोळू, डॉ योगेश पल्लेलू, राजू निलगंटी, आनंद पल्लेलु, रुपेश गायकवाड, तिरुपती परकीपडंला, राहुल वर्धा, सुशीलकुमार म्हेत्रे, सुनील सारंगी, सुभाष वाघमारे, कुर्मया बोंतालेलू, उमेश निलगंटी, शिवा म्हेत्रे, वेदमुर्ती म्हेत्रे, सतीश म्हेत्रे, सिद्धांत रंगापुरे, सुनील अयवळे, एजाज बागवान, राजू शिंदे आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश भंडारे यांनी केले तर आभार मल्लू म्हेत्रे यांनी मांनले.