त्या समाजाची 19 नावे मतदार यादीतून वगळली ; राष्ट्रवादी कार्याध्यक्ष उज्वला पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगावच्या माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष उज्वला पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. भोगाव मधील मतदार यादीत समाविष्ट झालेल्या एका समाजाच्या नागरिकांची 19 नावे यादीतून वगळण्यात आल्याचे मोहोळ तहसीलदार यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव मध्ये 2015 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत उज्वला पाटील या सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यावेळी गावात त्या समाजाचे एकही घर नव्हते आणि आताही नाही त्यानंतर झालेल्या 2020 मधील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्या समाजाची 34 मते आली आणि आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे दीडशे नागरिक आपली मतदार यादी मध्ये नावे पाहण्यासाठी रांगेत दिसली. ग्रामपंचायत मध्ये चौकशी केली असताना ग्रामपंचायतीने एकही दाखला दिला नाही त्यामुळे त्यांचे आधार कार्ड कशी निघाली आणि त्यांची मतदार यादीत नावे आली कुठून याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी आणि ती मतदार यादीतून नावे वगळावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली होती.
हा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेला होता त्याची चौकशी होऊन 34 पैकी 19 नावे वगळण्यात आल्याचे पत्र मोहोळचे तहसीलदार यांनी पाटील यांना दिले आहे. उर्वरित पंधरा नावेही बेकायदेशीरपणे समाविष्ट आहेत.
त्या पंधरा जणांचे हमीपत्र नाही, भटक्या विभक्त जातीचा दाखला नाही, त्यांची नावे कोणत्या आधारे मतदान यादीत घेतले तर यापुढे मी माहितीचा अधिकार टाकून सगळे कागदपत्र घेणार आहे.
स्थानिक लोकांना मतदान यादीत नाव नोंदवताना रेशन कार्ड, पंधरा वर्षाचा पुरावा, स्थानिक रहिवाशी दाखला, नातेवाईकांचे मतदान कार्ड मागितले जाते आणि ह्यांचे नाव नोंदवताना फक्त सरपंचाच्या रहिवासी वर नाव घेतलेत व आधार कार्ड पण देण्यात आले गावात शेती नाही, घर नाही, नातेवाईक नाही पंधरा वर्षाचा पुरावा नाही आणि तहसीलदार म्हणतात की फक्त रहिवासी आहे याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पाटील यांची आहे.