१० टक्के मराठा आरक्षणामध्ये आढळल्या गंभीर त्रुटी ; सकल मराठा समाजाने आणले निदर्शनास
सोलापूर : सोलापूर सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येऊन दहा टक्के मराठा आरक्षणामध्ये आढळलेल्या गंभीर त्रुटी बाबत मार्ग काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
शासनाने २० फेब्रुवारी २०२४ रोजी विधिमंडळात तागू केलेल्या १०% मराठा आरक्षणामध्ये (SEBC) शिक्षण व शासकीय नोकरीमध्ये हे आरक्षण लागू केले आहे परंतु आता NEET ची प्रवेश प्रक्रिया (वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया) चालू आहे फॉर्म भरण्याची शेवट तारीख ९ मार्च आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात १०% आरक्षणाचा मराठा विध्यार्थी व विद्यार्थिनींना लाभ मिळत नाही. ही अतिशय निषेधार्य बाब आहे.
तसेच ५ मार्च पासून ते ३१ मार्च पर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया राज्य शासनाने चालू केली आहे या प्रक्रियेमध्ये १०% मराठा आरक्षण लागू केले असून SEBC चे प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी हा १२ दिवसाचा आहे, तसेच नॉन क्रिमिलियर चे प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी हा पण किचकट व वेळखाऊ आहे त्यामुळे पोलीस भरती होणाऱ्या तरुण तरुणींना शासनाने भरती प्रक्रियेमध्ये वेळ वाढवून द्यावा व या गंभीर विषयास लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली.