सोलापूर – तुळजापुर सरहद्द ते मार्डी (प्रजिमा-39) या मार्गावरील होनसळ नजीक असलेल्या पुलाची तसेच कळमण – कौठाळी (प्रजिमा – 31) या मार्गावरील कौठाळी जवळ असलेल्या ओढ्यावरील पुलाची उंची त्वरीत वाढवण्याची मागणी पृथ्वीराज माने युवा मंचचे वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता एस.जी .मुनगिलवार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी कार्यकारी अभियंता धाेत्रे ही देखील उपस्थित हाेते.
यावेळी पृथ्वीराज माने युवा मंचचे अध्यक्ष सुनिल जाधव,सदस्य विशाल भोसले,सचीव तात्या कदम,सतीश पाटील, गणेश शिंदे, अंकुर चव्हाण, बिरू लेंगरे आदि उपस्थित होते.
सोलापूर -तुळजापुर या महामार्गावरील सरहद्द ते मार्डी (प्रजिमा – 39) या मार्गावर होनसळ नजीक मोठा ओढा असून या ठिकाणी असलेल्या पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी हा रस्ता पाण्यामुळे वहातूकीस बंद होतो दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक तरुण वाहून मृत झाला तर अनेक जनावरेदेखील यापूर्वी वाहून गेली आहेत. त्यामुळे भविष्यातील लहान – मोठ्या दुर्घटना टाळण्यासाठी या पुलाची उंची वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.
तर उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण – कौठाळी (प्रजिमा – 31) या मार्गावर कौठाळी नजीक मोठा ओढा असून या पुलाचे काही अंतरावर मोठा तलाव आहे त्यामुळे या पुलावर तलावाचे पाणी थांबून दरवर्षी किमान 1 ते 2 महिने रस्ता वहातूकीस बंद असतो त्यामुळे कौठाळी, शेरेवाडी, भागाईवाडी या गावाचा संपर्क तुटतो.एस.टी सेवा इतर वहाने बंद झाल्याने शेतकरी, नागरीक,शाळेच्या विद्यार्थ्यांचे मोठी गैरसोय होत आहे.या वर्षीच्या पावसामुळे सद्या असलेला पुल देखील वहातूकीस अयोग्य झालेला असल्यामुळे या पुलाची उंची वाढवणे आवश्यक असल्याचे निवेदन देवून चर्चेत सांगितले.
यावेळी सरहद्द ते मार्डी मार्गावर असलेली वहातुक संख्या व कळमण ते कौठाळी या मार्गावरील पुलामुळे या भागातील गावाची होणारी गैरसोय लक्षात घेता लवकर या दोन्ही पुलाची उंची वाढण्याची मागणी सुनील जाधव यांनी केली. या महत्वाचे प्रश्नाकडे लक्ष वेधल्यामुळे या भागातील नागरीकडून कौतुक होत आहे.

















