सोलापूर : जिल्हा परिषदेत मार्च महिन्यात सदस्यांचा कार्यकाळ संपून एप्रिल 2022 पासून प्रशासक नियुक्त झाला त्यामुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांचे कारभार संपुष्टात आला मागील 10 महिन्यांपासून प्रशासकीय कामकाज सुरू आहे.
तसे पाहिले तर सोलापूर जिल्हा परिषदेला पक्षनेता हे पद नाही, परंतु जिल्हा परिषदेमध्ये हे पद निर्माण करून पक्ष नेत्यांना बसायला केबिन, अँटी चेंबर देण्यात आले. त्यामुळे एखाद्या सदस्याचे ‘बिन पगारी फुल्ल अधिकारी’ असा रुबाब वाढल्याचे पाहायला मिळाला. 2017 ते 2022 दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये आनंद तानवडे व अण्णाराव बाराचारे यांना पक्ष नेत्याच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली.
या केबिनवरून जिल्हा परिषदेमध्ये बरच राजकारण पाहायला. मिळालं दरम्यान बाराचारे हे खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान पासून ते दिल्ली ते गल्लीपर्यंतच्या नेत्यांचे फोटो आपल्या चेंबरमध्ये लावले. त्यांनी कुणालाही नाराज केले नसल्याचे पाहायला मिळाले होते. आता सदस्यांची कारकीर्द संपून दहा महिने होऊन गेले तरी ते फोटो या कार्यालयात तसेच आहेत.
सध्या जलजीवन योजनेचे काम मिशन मोडवर सुरू आहे. वरचे कार्यालय कमी पडत असल्याने या विभागाने पक्षनेता कार्यालयाला वॉर रूम करून कामकाज जोरात सुरू आहे. या वॉर रूममध्ये आत जाऊन पाहिले असता राजकीय नेत्यांचे आहे तसे फोटो पाहायला मिळतात. या फोटोच्या छायेखाली सध्या जलजीवनचे काम सुरू आहे अद्याप येथे फोटो इथून हटवले नसल्याचे पाहायला मिळाले. बहुतेक बाराचारे हे फोटो घेऊन जायला विसरले असतील अशी चर्चा झेडपीत ऐकण्यास मिळाली.