सोलापूर : R.G. मागासवर्गीय बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी प्रभाकर वस्ती येथील संस्थेच्या कार्यालयात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी आर जी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पिंटू डावरे वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष ऍड बडेखान वंचित बहुजन आघाडीचे नाना कदम अंजलीताई गायकवाड प्रा धम्मपाल माशाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बर्डे आदीसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
करोना सारख्या महामारीच्या काळामध्ये देखील आर जी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने एक सामाजिक बांधिलकी जोपासत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक पिंटू डावरे यांनी दिली.
संतोष डोळसे, प्रवीण गायकवाड, सचिन कांबळे, नितीन भोसले, चिट्टू कांबळे, आकाश कांबळे, निखिल सुरवसे, आदर्श सरतापे, सिद्धार्थ रणखांबे, राजू चव्हाण, दिगंबर वाघमारे आदीसह बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

















