जिल्हा परिषदेच्या परिसरात पीपल्स या नावाचे रेस्टॉरंट आहे, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय या भागात नागरिकांची शासकीय कामा निमित्त मोठी वर्दळ असते, झेडपीमध्ये तर ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने येतात, त्यामुळे या रेस्टॉरंटला कायम गर्दी असते, सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, प्रशासन सतर्क झालंय, लॉकडाऊनची चर्चा होऊ लागली आहे, मात्र लॉकडाऊन कुणालाही परवडणारे नाही त्यामुळे मास्क वापरा, शारीरिक अंतर ठेवा, हात वारंवार धुवा असे आवाहन केले जात आहे याचं पार्श्वभूमीवर पीपल्स रेस्टॉरंट चालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत मोठा डिजिटल फ्लेक्स आपल्या हॉटेलच्या दर्शनी भागात लावून कोरोनाच्या नियमांची जनजागृती केली आहे, दरम्यान टिमके यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सरकार कोरोना पासून वाचण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी आवाहन करते , माझ्या हॉटेलमध्येही मोठ्या संख्येने नागरिक येतात ते आत मध्ये येताना हा बॅनर पाहतील आणि त्यांना कोरोना नियम लक्षात राहतील यासाठी हे बॅनर लावल्याचं त्यांनी सांगितलं.