सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी रमेश हसापुरे यांनी गुरुवारी काँग्रेस भवनात जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत मनसे इंजिन सोडून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. रमेश हसापुरे हे काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे यांचे लहान बंधू आहेत. प्रवेशानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना रमेश हसापुरे यांनी काँग्रेस प्रवेश करण्यामागील उद्देश सांगितला, केवळ धवलदादा जिल्हाध्यक्ष झाल्याने आपण काँग्रेस मध्ये आलो असून धवलसिंह देतील ती जबाबदारी पार पाडण्याची भूमिका त्यांनी मांडली….

















