सोलापूर : सोलापूर मंगळवेढा रोडवरील मरीआई चौकात सोमवारी विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केल्या प्रकरणी नगरसेविकेचे पती सुनील खटके यांच्यासह तब्बल 18 जणांवर फौजदारी चावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये १) सुनिल पांडुरंग खटके, २) मनोज भिमा पवार, ३) सचिन शिवाजी कदम, ४) शाम राम गांगुर्डे, ५) वामन वाघचवरे, ६) महादेव गवळी, ७) संजय देविदास मस्के, ८) शंकर दत्तात्रय ताकमोगे, ९) नारायण बचुटे, १०) प्रभाकर वामन वाघचवरे, ११) बाबु मधुकर अंकुश, १२) रवि डांगे, १३) अनिकेत मच्छिद्र घुले, १४) विद्या मुंकुद गायकवाड, १५) सुशिला कृष्णा पवार, १६) शंकुतला मधुकर अंकुश, १७) लक्ष्मी हाजी यमगल, १८) महेरून बाबासाहेब तांबोळी सर्व रा सोलापूर यांची नावे आहेत.
महापालिका व पोलीस आयुक्त यांचे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जमावबंदी तसेच सामाजीक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमास मनाई आदेश असताना तसेच ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्रीत येणेस मनाई असताना गुन्हा दाखल झालेल्या सर्वांनी संगमनत करून एकत्रीत येवून शासनाने तसेच पोलीसांनी दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करून महापालिकेने हायवेचे काम व्यवस्थीत केले नाही, रस्त्यावरचे सर्व घाण पाणी आमच्या दारात येत आहे, सांडपाण्याचे काम करून घ्या, नाहीतर आम्ही येथून उठणार नाही असे म्हणुन कोरोना व ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्याचे अनुषंगाने सोशल डिस्टंसीग न ठेवता मरीआई चौकात विनापरवाना रास्ता रोको आंदोलन करून या मार्गावरील येणारे जाणारे वाहतुकीस अडथळा करून वाहनांची गर्दी केलेली आहे.


















