Wednesday, March 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : सुंदर माझे कार्यालय अभियान, सायकल बँक, ऑपरेशन परिवर्तन उपक्रम “व्वा…,क्या बात है” ; नामदार नीलम गोरे यांनी केले कौतुक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 April 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर, दि.20(जिमाका): कोरोनाने निधन झाल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आले आहेत. त्यांचे पुनर्वसन  व्हावे, त्यांना सर्व लाभ मिळावे, यासाठी सामाजिक जबाबदारीतूनन सर्व विभागानी एकत्र येऊन जिल्ह्यातील अशा कुटुंबाच्या  शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक पायलट प्रकल्प तयार करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम  गोऱ्हे यांनी केल्या.


नियोजन  भवन  येथे जिल्हास्तरीय कोरोनाबाबत आढावा बैठकीत डॉ गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक  तेजस्वी सातपुते, वैशपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ श्रीमती जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदीप ढेले, पोलीस उपायुक्त डॉ दीपाली घाटे, महिला व बालविकास अधिकारी डॉ विजय खोमणे आदी उपस्थित होते.



श्रीमती गोऱ्हे यांनी सांगितले कि, कोरोनाने निधन झालेल्या कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे. ते कुटुंब निराधार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. टास्क फोर्स, कृषी, शालेय शिक्षण, आरोग्य, गृह या विभागांसह सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबासाठी एक सर्व समावेशक योजना आखावी. 1896 महिला विधवा झाल्या तर 41 बालकांचे दोन्ही पालक गमावले आहेत. यामुळे बालकांची सध्या नातेवाईक देखभाल व्यवस्थित करतात, याची पाहणी करावी. नातेवाईक सांभाळ करीत नसतील तर त्यांची सोय बालगृहासह सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात करावी. यासाठी प्रशिक्षीत सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. पतीचे निधन झाल्यानंतर त्याचे दुकान असेल किंवा इतर संपत्ती ही पत्नीच्या नावे होण्यासाठी यंत्रणांनी तालुकानिहाय शिबीरे घेऊन काम करावे. महिला शेतकरी असेल तर ती भूमिहीन होणार नाही, याची दक्षताही घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.


प्रत्येक महिन्याच्या लोकशाही दिनी महिलांच्या तक्रारीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अधिकारी उपलब्ध असावेत, असे नियोजन करावे. मिशन वात्सल्यमधील सर्व माहिती विधवा महिलांपर्यंत पोहोचवा. शेतकीर महिलांना कृषीविषयक लाभ मिळवून द्यावेत. यामधील लाभ मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव येणे महत्वाचे आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी 65 वर्षे वयाची अट, कमी उत्पन्नाचा दाखला त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, त्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.


कोविडमुळे निधन झालेल्या कुटुंबातील सदस्यांना ५० हजारांची मदत शासन देत आहे, याबाबत नागरिकांना माहितीसाठी हेल्पलाईन नंबर द्या. त्यांच्या त्रुटी दूर करून लाभ मिळवून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


घनकचरा आणि जैविक कचरा यांचे व्यवस्थापन होण्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या धर्तीवर नगरपालिका, नगरपरिषदेने व्यवस्थापन करावे. यासाठी नगरपालिकांच्या बैठका घेऊन त्यांचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सोलापूर शहराची पाणी टंचाई दूर करण्यासाठी योजना आखाव्यात, वन संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण योजनेचा वापर करावा, स्मार्ट सिटीबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत, याबाबत लेखी स्वरूपात अहवाल देण्याच्या सूचनाही श्रीमती गोऱ्हे यांनी केल्या.


आरोग्य, शिक्षण, महिला व बाल विकास, जैव विविधता याबाबत काय बदल झाले याचेही निरीक्षण नोंदवावे. पुरातन पाण्याचे स्त्रोत शोधून त्याचे जतन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.


सुंदर माझे कार्यालय या उपक्रमाचे कौतुक करून प्रत्येक ठिकाणी सौर उर्जेचा वापर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायकल बँक हा उपक्रम राबविण्यात आला हा उपक्रम कौतुकास्पद असून जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून अशा उपक्रमांना निधी दिला जावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शिवाय पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांच्या ऑपरेशन परिवर्तन या अभियानाचेही त्यांनी कौतुक केले. संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकल्प जाण्यासाठी प्रयत्न करावा, 61 हॉटस्पॉट असलेल्या गावातील महिलांनी अभिनंदन ठराव करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.


यावेळी जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी कोरोना, लसीकरण याबाबतची माहिती दिली. श्री. स्वामी यांनी मुलींच्या सायकल बँकेची माहिती दिली.


यावेळी श्रीमती गोऱ्हे यांनी कोरोना काळात लाभ मिळालेल्या बांधकाम कामगार, घरेलू कामगार, माथाडी कामगार, रिक्षाचालक यांची माहिती घेतली. लाभ न मिळालेल्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


यावेळी कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांच्या नावे पाच लाख रूपये ठेव योजनेतील प्रातिनिधीक स्वरूपात मंजूनाथ कांबळे, पूर्वा कांबळे, निखील कांबळे, श्रुतिका सदलापुरे, स्नेहा सदलापुरे, ओम कोरे यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच कोविड काळात महसूल विभागात काम करीत असलेल्या पतीचे निधन झालेल्या राणी साबळे यांना ५० लाखांचा धनादेश श्रीमती गोऱ्हे यांच्या हस्ते देण्यात आला.


यावेळी अस्मिता गायकवाड, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे,  गुरूशांत धुत्तरगावकर आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

Drunk & Drive | सोलापुरात मद्यधुंद कार चालकाने दोन दुचाकीस्वाराना उडवले

Next Post

दुःखद ! उत्तर सोलापूर तालुका शिवसेना प्रमुख शहाजी भोसले यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दुःखद ! उत्तर सोलापूर तालुका शिवसेना प्रमुख शहाजी भोसले यांचे निधन

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972636
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group