सोलापूर : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस विद्यापीठाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव शशिकांत मोकाशी, प्रभारी कुलसचिव डॉ एस के पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, गिर्यारोहक आनंद बनसोडे यांच्यासह तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार अमरदीप वाकडे, संपादक विजयकुमार पिसे, अमृत चौघुले, संजय येऊलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थितांना मतदान जनजागृतीची शपथ देण्यात आली. हा कार्यक्रम जिल्हा सुमारे 40 महाविद्यालयात लाईव्ह दाखवण्यात आला.
यावेळी तृतीय पंथीयांसह नवं मतदार झालेल्यांना मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले. आपल्या भाषणात कुलगुरू डॉ फडणवीस म्हणाल्या, आज वोट हे नोटवर विकले जात असल्याची वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र मत हे राष्ट्राची ताकद असून ते योग्य माणसासाठी वापर करा असे आवाहन केले….
प्रारंभी निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी प्रास्ताविक करताना नव मतदार नोंदणीसाठी राबवलेले उपक्रमांची माहिती देताना पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सोलापूर जिल्ह्याने ज्या पद्धतीने निवडणुक यंत्रणा राबवली तशीच यंत्रणा आगामी होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकीत राबवण्यात येणार असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली..
दरम्यान मतदार कार्ड आणि राष्ट्रीयत्व मिळाल्याचा आनन्द तृतीयपंथीयांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. माध्यमांसमोर बोलताना त्यांनी प्रशासन आणि निरामय आरोग्य धाम संस्थेचे आभार व्यक्त केले…..
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...
सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...