सोलापूर-प्रवाश्याच्या सोयीसाठी,सुरक्षित प्रवासासाठी एस.टी धावत असली तर केवळ विद्यार्थी, जेष्ठ नागरीकच एस्.टी त प्रवास करीत असले तर महामंडळाला तरी परवडणार कसे याचाही विचार करुन वेळेच्या क्षणीक मोहासाठी खाजगी वहानाने प्रवास न करता प्रवाश्यांनी एस.टी.नेच प्रवास करण्याची जाणीव ठेवायला हवी असे आवहान भागाईवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके पाटील यांनी केले.
सोलापूर- भागाईवाडी ही अतिवृष्टी व पाणी, खराब रस्त्यामुळे बंद असलेली एस.टी.पुर्ववत सुरु करण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी प्रवाशी सौ.अनिता अशोक सोमदळे व कुमा.माधुरी सोमदळे या मायलेकीच्या हस्ते एस.टी.चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नागनाथ काळे,भागवत गरड,चालक तुकाराम माने,वाहक महावीर जाधव हे उपस्थित होते.
भागाईवाडी,कौठाळी येथील विद्यार्थी शेळगाव, वडाळा येथे शिक्षण घेत असून त्यांचेसह प्रवाश्याची प्रचंड गैरसोय होती.शेळगाव -कौठाळी मार्गावरील असलेले खड्डे भरुन रस्ता वहातुक योग्य करण्यात आला. व आज सोलापूर शेळगाव मार्गे भागाईवाडी एसटी सेवा पुर्ववत सुरु करण्यात आली.प्रवाश्याचे सोयीसाठी एसटी धावत असली तरी विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांचेसह इतर प्रवाश्यांनी देखील प्रवास करणे आवश्यक आहे असल्याचे घोडके पाटील यांनी सांगितले.
▪️भागाईवाडी,कौठाळी विद्यार्थ्यांची सोय
अतिवृष्टी व पाण्यामुळे बंद असलेली सोलापूर- भागाईवाडी एस टी शेळगाव मार्गे सुरु झाल्याने विद्यार्थाची शैक्षणिक व जेष्ठ,इतर प्रवाश्याची बार्शी, सोलापूर,तुळजापूर जाण्यासाठी सोय झाली.आमच्या मार्गदर्शिका सरपंच परिषदेच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौ कविता घोडके पाटील यांनी सतत पाठपुरावा करुन प्रवाश्याची सोय केली.त्यांचे व एसटी महामंडळाचे कौठाळी गावच्या वतीने मी आभार मानते.
सौ.चंद्रप्रभा भास्कर,सरपंच कौठाळी
▪️प्रवाश्यासाठीच एसटी सेवा..
एस.टी ही प्रवाश्यासाठीच आहे मात्र प्रवाश्यांनी देखील एसटीनेच प्रवास करुन सहकार्य करावे असे आवहान वहातुक निरिक्षक उमा गव्हाणे यांनी केले.





















