सोलापूर : महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय घडामोडीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. सत्ता पडेल, सरकार बरखास्त होईल, भाजप सत्ता स्थापन करेल, सत्ता शिवसेनेकडे राहील असे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे शिवसेनेवर संघर्ष आणि संकटे काही नवीन नाहीत.अशा अनेक संकटांना शिवसेना टक्कर देत आलेली आहे. म्हणून मी आमचे कार्यकर्ते पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे सांगितले. काय म्हणाले गणेश वानकर पहा हा व्हिडिओ

















