सोलापूर : देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त सबंध राज्यात राष्ट्रवादी सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले असून त्याअंतर्गत सोलापुरात सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव तथा सोलापूर जिल्हा समन्वयक शेखर माने (shekhar mane) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शेखर माने यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व पक्षप्रेमी यांची प्रार्थनीय उपस्थिती पाहून सोलापूर शहरातून एक लाख सभासद नोंदणीचे उद्दिष्ट नक्कीच अपेक्षित असून शहरातील सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी ते नक्की पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला.
सुरुवातीला मंचावरील सर्व प्रमुख मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर कार्याध्यक्ष संतोष पवार(Santosh Pawar) यांनी करताना येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बूथ कमिटी अधिक मजबूत करण्यासाठी पुढील तीन वर्ष (2021 ते 2023) काळासाठी ही सभासद नोंदणी अभियान आजपासून शहरात सर्वत्र राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते महेश गादेकर, मनोहर सपाटे, शंकर पाटील, नलिनी चंदेले, सुनिता रोटे, जुबेर बागवान, जनार्दन कारमपुरी आदींनी सध्याचा काळ हा राष्ट्रवादीसाठी अत्यंत सुगीचा काळ असून राष्ट्रवादीचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र होत असल्याचे सांगत येणाऱ्या निवडणुकीनंतर सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता व राष्ट्रवादीचाच महापौर होणार व त्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकनिष्ठेने कामाला लागावे व त्याकरिता आम्ही सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते तसेच सभासदांच्या पूर्ण पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.
शहराध्यक्ष भारत जाधव यांनी राष्ट्रवादीच्या या सभासद नोंदणी द्वारे आपण संपूर्ण शहराला तसेच राज्याला दाखवून देऊयात की शरद पवार साहेबांचे धोरण तसेच पक्षाचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी समोर उपस्थित सर्व राष्ट्रवादी प्रेमी कंबर कसून कामाला लागले असून एक लाखाचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करू असा विश्वास दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे यांनी सभासद नोंदणी कशी करायची या संदर्भात संपूर्ण इत्यंभूत माहिती उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिली.
पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष.जयंत पाटील यांचे अत्यंत विश्वासू असलेले सांगलीचेशेखर माने यांनी सांगलीत देखील राजकीय चमत्कार घडविला असून समन्वयक म्हणून त्यांनी सोलापूर मध्ये जबाबदारी स्वीकारल्यापासून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रत्येक पदाधिकारी यांच्याशी त्यांनी वैयक्तिक संपर्क साधला असून यापुढील काळात सभासद नोंदणी बूथ कमिटी व मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत नक्कीच सोलापूर शहरात एक राष्ट्रवादी विचार सर्वत्र पसरवण्याचे काम केले जाईल असे निक्षून सांगितले.
याच कार्यक्रमात शहरातील विविध पक्षातील सदस्यांचे पक्ष प्रवेश तसेच विविध सेलच्या नव नियुक्ती जाहीर करण्यात आले.
या कार्यक्रमाला राजन जाधव चंद्रकांत पवार लता ढेरे लता फुटाणे मंगल कोल्हे नंदा काँग्रे बिस्मिल्ला शिकलगार चंद्रकांत पवार निशांत सावळे श्रीनिवास कोंडी बाबासाहेब जाधव जावेद खैरदी प्रकाश जाधव प्रशांत बाबर सुहास कदम अमीर शेख तनवीर गुलजार बसवराज कोळी आनंद मुस्तारे सोमनाथ शिंदे प्रमोद भोसले युवराज माने, ज्योतिबा गुंड रुपेश भोसले आशिष जेटीथोर लहू हावले शिवराज विभूते प्रकाश झाडबुके, गणेश छत्रबंद, मोबिन भेलमे, मौला शेख, लखन कांबळे फिरोज शेख सागर गव्हाणे सागर शितोळे खलिल शेख गफ्फुर शेख, सर्फराज शेख, अश्विनी भोसले, शशिकला कसपटे, गौरा कोरे, वंदना भोसले, पूजा वाकसे, शौर्या पवार, मुबीन शेख, वसीम बुरहान, फारुक शेख, मुसा अत्तार आदी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन मध्य विधानसभा कार्याध्यक्ष बसवराज कोळी यांनी केले.

















