सोलापूर : प्रभाग 15 मध्ये नगरसेविका वैष्णवी अंबादास करगुळे यांच्या विकास कामाच्या भांडवली निधीतुन जुनि काडादी चाळ ,रेल्वे लाईन सोलापुर येथे पिण्याचे पाणी पाईप लाईन टाकणे कामाचा शुभारंभ नगरसेविका करगुळे तसेच राजकुमार माहिमकर जगदीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रशांत जाकलेकर ,सतीश देवकते, सुधाकर वळेकर, अर्जुन चौधरी, राजश्री कुलकर्णी, शालिनी महिमकर, ज्योती वळेकर ,सोमशिंग चव्हाण सुभाष वाघमारे, मारू भंडारे, अजय अवलुर, राहुल यमकोटे, रोहित पुंडा, पिंटू बेंजरपे, बालराज करगुळे यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सोसायटीतील महिलांनी हे काम सुरू झाल्याबद्दल आभार व्यक्त करताना काही विघ्नसंतोषी लोकांमुळे कामात व्यक्त आल्याचा आरोप केला नेमका त्यांचा निशाणा कुणावर होता याची मात्र या कामानंतर चर्चा होत आहे.

















